David Warner : क्रिकेटनंतर इंस्टावर धुमाकूळ घालणारा डेव्हिड वॉर्नर झाला गणेशभक्तीत लीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chaturthi Festival 2022 David Warner Wishes Fans On Ganesh Chaturthi

David Warner : क्रिकेटनंतर इंस्टावर धुमाकूळ घालणारा डेव्हिड वॉर्नर झाला गणेशभक्तीत लीन

Ganesh Chaturthi Festival 2022 David Warner Wishes Fans : देशभरात गणेश चतुर्थीचा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या दिवशी लोक घराघरात गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून पूजा-अर्चा करतात. अनंत चतुर्दशीला दहाव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. क्रीडा विश्वातही गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांसारख्या क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांचे अभिनंदन केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही श्री गणेशाच्या भक्तीत तल्लीन दिसला आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे भारतीय प्रेम कुणापासून लपलेले नाही. यावेळी भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि या निमित्त गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन दिसला. त्याने बाप्पासोबतचा स्वतःचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरची भारतात चांगली फॅन फॉलोइंग आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट कारकिर्दीत व्यस्त असतानाही गणेश चतुर्थीच्या आगमनानिमित्त त्यांनी खास पोस्ट करून करोडो भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.

वॉर्नरने गणेशजींसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये भगवान गणेश विशाल रूपात दिसत आहेत. डेव्हिड वॉर्नर त्याच्या खाली दोन्ही हात जोडून उभा आहे. यादरम्यान वॉर्नरने आपल्या देशाची जर्सी परिधान केली आहे. फोटो शेअर करताना वॉर्नरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.