Gautam Gambhir Angry | तर मी माझ्या तिकीटाचे पैसे परत मागितले असते - गौतम गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam-Gambhir-Williamson-NZ

पाहा, तुम्हाला पटतंय का गंभीरचं मत

तर मी माझ्या तिकीटाचे पैसे परत मागितले असते - गौतम गंभीर

T20 World Cup : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघाचा ८ गड्यांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने मोक्याच्या क्षणी धावा करत पहिलं टी२० विश्वविजेतेपद जिंकलं. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावांपर्यंत मजल मारली. पण गोलंदाजीच्या वेळी न्यूझाीलंडला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याच मुद्द्यावरून गौतम गंभीरने रोखठोक मत मांडलं.

हेही वाचा: भारताला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरला ऑस्ट्रेलियन खेळाडूनं झापलं

न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या वेळी कर्णधार केन विल्यमसनने ४८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. पण त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही तिशी गाठता आली नाही. तरीदेखील त्यांनी ४ बाद १७२ धावांची मजल मारली. खरा खेळ गोलंदाजीच्या वेळी फसला. ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी लवकर बाद झाला पण त्यानंतर त्यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे काहीसा नाराज झालेल्या गौतम गंभीर आपली प्रतिक्रिया दिली.

Gautam Gambhir

Gautam Gambhir

हेही वाचा: पराभवानंतर न्यूझीलंड खेळाडूच्या दोन शब्दांच्या ट्वीटने खळबळ

"टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतानंतर माझा सर्वात आवडता संघ न्यूझीलंड होता. पण अंतिम सामन्यात मात्र त्यांना एखाद्या शिकाऊ संघासारखं पराभूत करण्यात आलं. ४ बाद १७२ ही धावसंख्या अंतिम सामन्यासाठी उत्तम होती. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा बचाव करणं फार कठीण नसतं. न्यूझीलंडच्या संघाकडे समतोल गोलंदाजी होती. पण भारत किंवा इंग्लंडला हरवणारा न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध दिसला नाही. न्यूझीलंडचा संघ कायम त्यांच्या प्लॅनिंगसाठी ओळखला जातो. पण यावेळी त्यांचं प्लॅनिंग फसलं. जर मी स्वत: न्यूझीलंडचा समर्थक असतो तर मी संघाकडून थेट माझ्या तिकीटाचे पैसे परत मागितले असते", असं रोखठोक मत त्याने व्यक्त केलं.

Australia vs New Zealand

Australia vs New Zealand

हेही वाचा: T20 WC: हर्षा भोगलेंच्या संघात ३ पाकिस्तानी खेळाडू, पाहा टीम

"न्यूझीलंडच्या गोलंदाजीने मला प्रचंड निराश केलं. ती कामगिरी फायनलला साजेशी नव्हती. न्यूझीलंडचे गोलंदाज सतत आखूड टप्प्याची गोलंदाजी का करत होते याचा अंदाज लावणं शक्यच नव्हतं. मिचेल मार्शला गोलंदाजी करताना तर गोलंदाजांची लाईनदेखील चुकीची होती. मिचेल मार्श हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्याने त्याचं बहुतांश क्रिकेट हे उसळत्या पिचवरच खेळलं आहे. त्यामुळे पुल शॉट मारणं त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही", असं सांगत गंभीरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चूक अधोरेखित केली.

loading image
go to top