Gautam Gambhir : कायम वादग्रस्त वक्तव्य का करतोस...? चाहता थेट भिडला, गंभीरनेही दिलं सडेतोड उत्तर

Gautam Gambhir : कायम वादग्रस्त वक्तव्य का करतोस...? चाहता थेट भिडला, गंभीरनेही दिलं सडेतोड उत्तर

Gautam Gambhir : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं एखादं वादग्रस्त वक्तव्य केलं नाही असा एक दिवसही जात नाही. गौतम गंभीर हा आपल्या हटके आणि सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्धच आहे. गंभीरची अनेक वक्तव्य चाहत्यांना भावतात तर काही वादाच्या भोवऱ्यात अडकतात. गौतम गंभीरने नुकतेच केकेआर पुन्हा जॉईन केलं आहे. आधी तो संघाचा कर्णधार होता. आता तो संघ व्यवस्थापनात मोठी भुमिका बजावत आहे.

Gautam Gambhir : कायम वादग्रस्त वक्तव्य का करतोस...? चाहता थेट भिडला, गंभीरनेही दिलं सडेतोड उत्तर
Rohit Sharma : बुमराला साथच मिळाली नाही; ४०० धावा होण्याइतकी खेळपट्टी नव्हती - रोहित

दरम्यान, गंभीरने ट्विटरवर (एक्स) एक प्रश्नोत्तराचा सेशन ठेवला होता. यावेळी एका चाहता गंभीरला थेट भिडला होता. त्याने विचारले की, तू कायम वादग्रस्त वक्तव्य का करतोस? आपल्या सडेतोड वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या गंभीरने या प्रश्नाचे देखील सडेतोड उत्तर दिलं.

गौतम गंभीर म्हणाला की, 'मला जे जाणवतं ते मी बोलतो. या वादांमुळे कोणाला फायदा होतो हे तुम्ही पाहा.'

याच प्रश्नोत्तराच्या तासात युवराज सिंग आणि गौतम गंभीरने काही प्रश्नांची अत्यंत रोचक उत्तरे दिली. या दोघांना वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला कोणाकडून सर्वाधिक धोका आहे असे विचारण्यात आले.

त्यावेळी गंभीर म्हणाला की, 'अफगाणिस्तानकडून आपल्याला सर्वात मोठा धोका आहे, विंडीजमधील परिस्थिती त्यांना पोषक आहे. ऑस्ट्रेलिया देखील आपल्याला जड जाऊ शकते कारण त्यांच्याकडे इम्पॅक्ट प्लेअर आहेत. इंग्लंडही आव्हान उभं करू शकते कारण ज्या प्रकारे टी 20 क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे ते त्याच प्रकारचं टी 20 क्रिकेट खेळत आहेत.'

Gautam Gambhir : कायम वादग्रस्त वक्तव्य का करतोस...? चाहता थेट भिडला, गंभीरनेही दिलं सडेतोड उत्तर
Rishabh Pant : बरोबर एका वर्षापूर्वी होत्याच नव्हतं झालं... ऋषभ पंतचं आयुष्यच बदलून गेलं

युवराज सिंग या प्रश्नावर म्हणाला की, 'माझं याबाबत वेगळं मत आहे विंडीजमधील टी 20 वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका जिंकू शकते. त्यांनी मर्यादित षटकांची स्पर्धा जिंकलेली नाही. वनडे वर्ल्डकपमध्ये आफ्रिका जशी खेळली आहे ते पाहता त्यांना संधी आहे. तसेच पाकिस्तान देखील धोकादायक संघ आहे.'

युवराजने पाकिस्तानचं नाव घेताच गंभीर म्हणाला की, 'पाकिस्तानची फिल्डिंग पाहिली का? वनडे वर्ल्डकपमध्ये ते त्यांच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात खराब क्रिकेट खेळले आहेत. जर त्यांना टी 20 क्रिकेटमध्ये आव्हान निर्माण करायचं असेल तर त्यांना खूप कष्ट करावे लागतील.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com