Gautam Gambhir : विराटचा फॉर्म परखण्याचा हा संघ नाही, त्या धावा...

Gautam Gambhir Virat Kohli
Gautam Gambhir Virat Kohliesakal
Updated on

Virat Kohli Gautam Gambhir : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने जवळपास सहा महिन्यानंतर अर्धशतक झळकावले. त्याने आशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगविरूद्ध (Hong Kong) 44 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसोबत 98 धावांची भागीदारी रचली. सूर्याने देखील 26 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली. या अर्धशतकानंतर विराट कोहली आता फॉर्ममध्ये (Virat Kohli Batting Form) आला आहे अशी चर्चा सुरू झाली. मात्र भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचे मत मात्र थोडे वेगळे आहे.

Gautam Gambhir Virat Kohli
BAN vs SL : कुसल भिडला! मात्र महेदीच्या 'नो बॉल'ने लंका पोहचली सुपर 4 मध्ये

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, 'विराट कोहली आणि इतर कोणत्याही फलंदाजाची बॅटिंग परखण्यासाठी हा (हाँगकाँग) विरोधी संघ योग्य नाही. मात्र या धावा महत्वाच्या होत्या. तुम्ही मैदानावर जाता आणि धावा करण्यासाठी आपले सर्वस्व देता. मग तुम्ही समोर कोणता संघ आहे याचा विचार करत नाही.'

गंभीर पुढे म्हणाला की, 'विराट कोहली पुन्हा आपल्या जुन्या लयीत येत आहे का हे तपासण्यासाठी येणाऱ्या काही सामन्यात तो कसा फलंदाजी करतो हे पाहणे गरजेचे आहे. कारण हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यातील बॉलिंग चांगल्या प्रतीची नव्हती. मात्र कोहलीने जवळपास 60 धावांची खेळी केली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना देखील संधी होती. मात्र विराट कोहलीने 60 धावा केल्या. हे रोहित आणि राहुलला जमले नाही. कोहलीला अशा एका इनिंगची गरज होती. कारण तो विश्रांतीनंतर संघात परतत आहे. खेळाडूसाठी हे सोपे नसते.

Gautam Gambhir Virat Kohli
SL vs BAN : एकाचेही अर्धशतक नाही! तरी बांगलादेशने केल्या 183 धावा

विराट कोहलीने हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यात आपले 31 वे टी 20 अर्धशतक पूर्ण केले. त्याने रोहित शर्माच्या 31 टी 20 अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. टी 20 क्रिकेटमध्ये बाबर आझम, डेव्हिड वॉर्नर, मार्टिन गप्टिल आणि पॉल स्टर्लिंग यांनीच 20 पेक्षा जास्त अर्धशतके ठोकली आहे. विराट नुकताच भारताकडून तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. जागतिक स्तरावर न्यूझीलंडच्या रॉस टेलरनेच हा कारनामा केला होता. आता विराट कोहली त्याच्या पंक्तीत बसला आहे. विराटने पाकिस्ताविरूद्धच्या सामन्यात देखील 34 चेंडूत 35 धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com