गौतम गंभीरने उपस्थित केले विराटच्या संघावर गंभीर प्रश्नचिन्ह; काय आहे ते वाचा...

gautam on team india
gautam on team india

नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेटसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांत कठीण परिस्थितीत दडपणाचा सामना करताना भारतीय खेळाडूंची मानसिकता कमी पडते आणि तोपर्यंत ते विश्वविजेते म्हणू शकत नाही, असा गंभीर आरोप माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केला आहे. 

1983 आणि 2011 मध्ये विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला गेल्या काही स्पर्धांमध्ये महत्त्वाच्या टप्प्यावर अपयश आलेले आहे. गेल्या दोन स्पर्धांसह एकूण चार वेळा उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलेले आहे. चांगले खेळाडू आणि सक्षम खेळाडू असा बदल जेव्हा होतो, तेव्हा ते खेळाडू अतिशय कठीण परिस्थितीत संघाला बाजी मारून देतात. पण सध्याच्या संघातील खेळाडू आव्हानात्मक परिस्थितीत दडपणाचा सामना करण्यास कमी पडत आहेत; मात्र त्याच वेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू सक्षम असल्याचे सिद्ध करत आहेत, असे गंभीरने म्हटले आहे. 

आपले खेळाडू साखळी सामन्यात सर्वोत्तम खेळ करतात, परंतु उपांत्य फेरीसारखे बाद फेरीचे सामने असतात तेव्हा दडपणाचा सामना करण्यात मानसिकतेत ते कमी पडतात, जोपर्यंत ते ही अग्निपरीक्षा पार करत नाहीत, तोपर्यंत ते विश्वविजेते म्हणवू शकत नाही, असे रोखठोक मत गंभीरने व्यक्त केले आहे. 

आपल्याकडे सर्व सुविधा आहेत, विश्वविजेते बनण्याची सर्वांगिण क्षमताही आहे; परंतु जोपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर उतरत नाही आणि सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विश्वविजेते म्हणणार नाही, असे 2011 मध्ये विश्वविजेत्या संघाचा सदस्य असलेला गंभीर म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com