मॅक्सवेल कोरोना पॉझिटिव्ह; BBLमध्ये कोरोनाचा धुमाकूळ

Glenn Maxwell Corona Positive
Glenn Maxwell Corona Positiveesakal
Updated on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियात अ‍ॅशेस मालिकेबरोबरच बीग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धा देखील सुरु आहे. बीग बॅश लीगच्या बायो बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. काही संघातील १० ते १२ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Positive) आढळून येत असल्याने सामने स्थगित करण्याची मालिकाच सुरु झाली आहे. (BBL Latest News)

Glenn Maxwell Corona Positive
भारताला जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले

मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) कोरोनाची लागण झाल्याची माहिती फ्रेंचायजीने दिली. त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर मॅक्सवेलला (Glenn Maxwell Corona Positive) विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मेलबर्न स्टार्सचे आतापर्यंत १२ खेळाडू आणि आठ सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यंदाच्या हंगामात मेलबर्न स्टार्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यांना ८ सामन्यापैकी फक्त ३ सामने जिंकता आले आहेत. ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. (BBL Corona Positive)

Glenn Maxwell Corona Positive
रणजी ट्रॉफी स्थगित; देशांतर्गत क्रिकेटला लागले पुन्हा कोरोनाचे ग्रहण

बीग बॅश लीगमधील संघामध्ये कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजचा ब्रिसबेन हीट (Brisbane Heat) आणि सिडनी सिक्सर (Sydney Sixers) यांच्यातील सामनाही स्थगित करावा लागला आहे. ब्रिसबेन हीट संघातील तब्बल १२ खेळाडूंची पीसीआर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या १२ खेळाडूंची रिप्लेसमेंट २४ तासात उभा करणे ब्रिसबेन हीटला शक्य झाले नाही. त्यांना आजच्या सामन्यासाठी १३ खेळाडूंचा संघ तयार करायचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com