Glenn Phillips : ग्लेन फिलिप्स एकटा नडला; बांगलादेशचा तोंडचा घास पळवला

Glenn Phillips
Glenn Phillips esakal

Glenn Phillips : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ग्लेन फिलिप्सने बांगलादेशचा तोंडचा घास पळवला. ढाका येथील दुसऱ्या कसोटीत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर चौथ्या डावात किवींना विजयासाठी 137 धावांची गरज होती. मात्र न्यूझीलंडची अवस्था 6 बाद 69 धावा अशी झाली होती. मात्र ग्लेन फिलिप्सने नाबाद 40 धावा करत विजय खेचून आणला. त्याला मिचेल सँटनरने 35 धावा करत चांगली साथ दिली.

Glenn Phillips
WPL Auction : एका डावात 10 विकेट घेणारी काशवी गौतम गुजरातच्या ताफ्यात! ठरली सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात सर्वबाद 172 धावा केल्या होत्या. मुशफिकूर रहीमनं सर्वाधिक 35 तर शहादत हुसैनने 31 धावा करत चांगली साथ दिली. तर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 3, मिचेल सँटनरने 3 विकेट्स घेतल्या. एजाझ पटेलने 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.

यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात 180 धावा करत चोख प्रत्युत्तर दिले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 87 धावा केल्या. पहिल्या डावात किवींनी 8 धावांची मात्र महत्वपूर्ण आघाडी घेतली.

Glenn Phillips
WPL Auction : एका डावात 10 विकेट घेणारी काशवी गौतम गुजरातच्या ताफ्यात! ठरली सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू

दुसऱ्या डावात बांगलादेशला 144 धावात रोखले. यावेळी एजाझ पटेलने दमदार गोलंदाजी करत बांगलादेशचे 6 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला सँटनरने 3 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 137 धावांचे आव्हान होते. हे आव्हान पार करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ 50 धावात गार झाला होता. मात्र सातव्या विकेट्ससाठी ग्लेन फिलिप्स (40 धावा) आणि मिचेल सँटनर (35 धावा) यांनी 68 धावांची नाबाद भागीदारी रचली.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com