टीम इंडियाचा 'टी-20 किंग' करणार कमबॅक!

वृत्तसंस्था
Saturday, 25 January 2020

टी-20 संघात जागा मिळवायची असेल तर आयपीएल हा सर्वांत चांगला पर्याय आहे. मी कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे याची सर्वांना कल्पना आहे.

मुंबई : भारताचा एकेकाळचा 'टी-20 किंग' अशी ख्याती असलेला सुरेश रैना टी-20 विश्वकरंडकातून पुनरागमन करण्याचे ध्येय बाळगून आहे. भारतीय संघात स्थान मिळवणे आता खूप अवघड आहे हे माहित असूनही त्याने प्रयत्न करणे सुरु ठेवले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एवढ्यातच पुनरागमनाची इच्छा सोडून देणं हे फार लवकर ठरेल, असे म्हणत त्याने पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ''मी सध्या कोणतेही लक्ष्य ठेवलेले नाही. मी कोठेही क्रिकेट खेळलो तरी मला त्याचा नेहमीच आनंद मिळाला आहे.'' 

- विराट राहुलला म्हणाला 'ग्लोव्ह्ज घाल' अन् रिषभ पंत राहिला 'बेंचवर'

''जर मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकलो, तर मला किती तयारीची गरज आहे हे मला कळेल. संघाला सध्या कशा प्रकारच्या खेळाची गरज आहे, याची मला माझ्या अनुभवामुळे कल्पना आहे. त्यामुळे माझ्या आयपीएलमधील कामगिरीवर माझ्या पुनरागमनाच्या संधी अवलंबून आहेत.''

- भारताचा 'हा' मराठमोळा बॉलर निवड समितीच्या शर्यतीत!

गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून बाहेर आल्यावर त्याच्याकडे किती काळ क्रिकेट खेळण्याची ताकद आहे यावर बोलताना तो म्हणाला, ''जर मी माझा गुडघा मजबूत करु शकलो आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकलो तर माझ्याकडे दोन-तीन वर्षांसाठी क्रिकेट उरते. एकापाठोपाठ दोन टी20 विश्वकरंडक आहेत आणि मी टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.''

- INDvsNZ : 200 पेक्षा जास्त रन्सचं टार्गेट गाठायचंय? डोण्ट वरी, राहुल आहे ना!

भारतीय संघात मधल्या फळीत कोणाला जागा मिळणार यावर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नसल्याने रैना पुनरागमनाची आशा बाळगून आहे. याबाबत तो म्हणाला, ''मला जर संघात पुन्हा खेळायचे असेल तर मला चांगली कामगिरी करुन दाखवावीच लागेल. टी-20 संघात जागा मिळवायची असेल तर आयपीएल हा सर्वांत चांगला पर्याय आहे. मी कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे याची सर्वांना कल्पना आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A good IPL make comeback for T20 World Cup 2020 says Suresh Raina