INDvsNZ : 200 पेक्षा जास्त रन्सचं टार्गेट गाठायचंय? डोण्ट वरी, राहुल आहे ना!

KL_Rahul
KL_Rahul

ऑकलंड : मधल्या फळीत दडपणाखाली चांगली फलंदाजी करून सामना जिंकून परतणारा फलंदाज संघाला हवा होता. श्रेयसने 10 धावांची सरासरी राखताना अर्धशतक करूनही जास्त गाजावाजा न करता काम चालू ठेवले. त्याच्या फटक्यात ताकद आहे. तसेच तो आयपीएल स्पर्धेत कप्तानी करत असल्याने त्याला एक प्रकारची जबाबदारीची जाणीव झाली आहे. आजचा त्याचा खेळ लाजबाब होता.

माझ्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मला कळून चुकले आहे की फक्त ताकद लावून मोठे फटके मारणे ही माझी शैली नाही. मला तंत्राचा वापर करून क्रिकेटचे फटके मारणे आवडते. गेल्या दीड वर्षात यश अपयशाचे फटके झेलताना मी बरेच काही शिकलो आहे.

आज मला मोठे फटके मारता आले त्याचे कारण तेच आहे. विकेट किपींगचा मी आनंद घेतोय. मी गेली दोन वर्ष आयपीएल संघाकरता विकेट किपींग करतो आहे तसेच मी स्थानिक सामन्यातही विकेट किपींग केली आहे. मी आनंद घेतो आहे नव्या जबाबदारीचा, असे मत अर्धशतकी खेळी केलेल्या के. एल. राहुलने मॅच जिंकल्यानंतर व्यक्त केले. 

दरम्यान, भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या किवीज फलंदाजांनी 20 षटकांत टीम इंडियासमोर 204 रन्सचे आव्हानात्मक टार्गेट उभे केले. त्यानंतर भारताच्या के. एल. राहुल, कॅप्टन कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी हाफ सेंच्युरी  झळकावत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. 

टी-20 प्रकारात 200 पेक्षा जास्त रन्सचे टार्गेट पूर्ण करण्याचा पराक्रम टीम इंडियाने आतापर्यंत 4 वेळा केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 2 वेळा 200 पेक्षा जास्त धावांचे टार्गेट गाठले आहे. आणि हे दोन्ही विजय कांगारुंनी न्यूझीलंड आणि भारत या दोन संघांविरुद्ध साजरे केले आहेत. 

200 रन्सचं टार्गेट गाठायचंय? राहुल आहे

के. एल. राहुलबद्दल एक दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये 200 पेक्षा जास्त धावांचे टार्गेट चेस करताना राहुलने कमालीच्या खेळी साकारल्या आहेत. 2016 मध्ये वेस्ट इंडिजने भारतापुढे 246 धावांचा डोंगर उभारला होता. त्यावेळी राहुलने 51 चेंडूत नाबाद 110 धावांची शतकी खेळी केली होती. पुन्हा 2019 मध्ये वेस्ट इंडिजनेच भारतापुढे विजयासाठी 208 धावांचे आव्हान उभारल्यानंतर राहुलने 40 चेंडूत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. 

आज झालेल्या सामन्यातही न्यूझीलंडने भारताला 204 धावांचे टार्गेट दिल्यानंतर राहुलने 27 चेंडूत 56 धावांची बरसात केली. भारताने 200 पेक्षा जास्त धावांचे टार्गेट 4 वेळा गाठले आहे. त्यापैकी 3 सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात राहुलने महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यामुळे जर 200 पेक्षा जास्त टार्गेट चेस करायचे असेल आणि राहुलही संघात असेल तर टीम इंडियाला काळजी करायची काही गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com