

Governor Questions High Prices of Messi Event Tickets
Esakal
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आज कोलकात्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि व्यवस्थेवरून आता पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी राज्य सरकारला कठोर शब्दात सुनावलं आहे. राज्य सरकारला याबाबत पत्र पाठवून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. अनेक फुटबॉल प्रेमींनी राज्यपालांकडे तक्रार केली होती की, तिकिटांची किंमत खूपच जास्त असल्यानं कोलकात्यातली आयोजित कार्यक्रमात लाडक्या खेळाडूला पाहण्याची संधी मिळू शखली नाही. या तक्रारीनंतरच राज्यपालांनी अहवाल मागवला आहे.