India’s Fastest Man! भारताच्या गुरविंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदात पार केले १०० मीटरचे अंतर; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले

Gurvindervir Singh breaks India 100m national record: गुरविंदरवीर सिंगने भारतीय अॅथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या १०० मीटर धावण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. Federation Cup 2026 स्पर्धेत गुरविंदरवीरने अवघ्या १०.०९ सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले.
Gurvindervir Singh breaks India 100m national record

Gurvindervir Singh breaks India 100m national record

Updated on

Gurvindervir Singh qualifies for Commonwealth Games 2026: पंजाबच्या गुरविंदरवीर सिंगने फेडरेशन कप २०२६मध्ये पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत अवघ्या १०.०९ सेकंदांची ऐतिहासिक वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. रांची येथील बिर्सा मुंडा स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय धावपटूंनी कमालीची कामगिरी केली आहे. गुरविंदरवीर सिंगने १०० मीटर अंतर अवघ्या १०.०९ सेकंदात कापून भारताचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान धावपटू बनण्याचा मान मिळवला. १०० मीटरचे अंतर १०.१० सेकंदाच्या आत पार करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com