IND Vs NZ : बीसीसीआयला हवं हलाल मांस! खेळाडूंचा डाएट चार्टवरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bcci

बीसीसीआयला हवं हलाल मांस! खेळाडूंचा डाएट चार्टवरून वाद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कानपूर : न्यझीलंडविरुद्ध पार पडलेल्या टी-२० मालिकेत भारताने ३-० असा विजय प्राप्त केला. आता कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापेक्षा हलाल मांसाची चर्चा सुरू झाली आहे. खेळाडूंच्या डाएट चार्टच्या मेनूमध्ये हलाल मीटचा समावेश असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. याला कारण आहे कानपूरमधील खेळाडूंचा डाएट चार्ट. बीसीसीआय प्रमोट्स हलाल (#BCCI प्रमोट्स हलाल) मंगळवारी सकाळी ट्विटरवर ट्रेंडिंग सुरू झाले. दोन्ही संघ पहिल्या कसोटीसाठी कानपूरला पोहोचले आहेत. सर्व खेळाडू हॉटेल लँडमार्क टॉवर येथे बायो-बबलमध्ये राहतील.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

खेळाडूंच्या डाएट चार्टच्या मेनूमध्ये हलाल मीटचा समावेश असल्याची माहिती मिळताच सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली. याबाबत बोर्डावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हलाल मीट दिल्याबद्दल ट्विटरवर २१ हजारांहून अधिक लोक बीसीसीआयला प्रश्न विचारत आहेत. हिंदू धर्माचे लोक सहसा झटके खाल्लेले प्राणी खातात, तर मुस्लिम समुदाय हलाल मांस खाणे पसंत करतात. हिंदू धर्मानुसार हलाल मांस खाण्यास मनाई आहे. असे असताना बीसीसीआय किंवा भारतीय संघ व्यवस्थापन खेळाडूंना त्यांच्या विरोधात जाण्यास भाग पाडणार कसे, असा प्रश्न चाहते विचारत आहे.

जेवणाच्या मेन्यूवरून वाद

बोर्डाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी फूड मेनू जारी केला आहे. दिवसभर काउंटर, स्टेडियमवर मिनी ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, चहाच्या वेळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण. या मेनूमधून डुक्कराचे मांस आणि गोमांस वगळण्यात आले आहे. मांसाहारी पदार्थांमध्ये हलाल मांसाचा समावेश आहे, अशी माहिती एका न्यूज चॅनलच्या बातमीवरून पुढे आली आहे.

हेही वाचा: Video : बबिताचा शॉर्ट ड्रेसमधील डान्स बघितला का?

बीसीआयला बदनाम करण्याचा प्रयत्न

हा अनावश्यक ट्रेंड चालू आहे. हा ट्रेंड चालवणारे बीसीसीआयला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. BCCI आणि UPCA अशा संस्था आहेत ज्या कधीही कोणाशीही भेदभाव करत नाही, असे प्रमोट्स हलाल बद्दल बोलताना UPCA चे सर्वोच्च समितीचे अधिकारी अहमद अली खान म्हणाले.

loading image
go to top