Munmun Dutta Video : बबिताचा शॉर्ट ड्रेसमधील डान्स बघितला का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

munmun dutta

Video : बबिताचा शॉर्ट ड्रेसमधील डान्स बघितला का?

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजे बबिताने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओत ती इमरान हाशमीच्या लेझी लाड या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बबिता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती वेगवगळे फोटो आणि व्हिडिओ टाकून चाहत्यांच्या भेटीला येत असते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मुनमुन दत्ता या मालिकेत बबिता ची भूमिका साकारली आहे. मागील काही दिवसांपासून ती सतत चर्चेत आहे. कधी टप्पूसोबत असलेल्या अपेअरमुळे तर कधी अन्य कारणामुळे. टप्पूसोबत नाव जोडल्यावर तिने आपले मत व्यक्त केले होते. तसेच नाराजीही व्यक्त केली होती.

आता तिने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसत आहे. तिच्या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘या सुंदर डान्सचा सिक्वेन्स शिकण्याचा प्रयत्न केला. या सुंदर चालींसाठी कोरिओग्राफरला सलाम. मेशाप्रमाणेच, मी नेहमीच ट्रेंडमध्ये उशिरा येतो. मला वाटते की मी खरोखर ‘आळशी’ आहे’, असे तिने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे.

तिचे भाव पाहण्यासारखे

व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ता लेझी लाड गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. धनचक्कर चित्रपटातील हे गाणे असून यात इमरान हाशमी आणि विद्या बालन यांच्या भूमिका आहेत. मल्टीकलर शॉर्ट ड्रेसमध्ये ती अप्रतिम डान्स मूव्हज करीत आहे. खुल्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या गाण्यातील तिचे भाव पाहण्यासारखे आहेत. या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

चाहत्याने लिहिले की...

बबिताच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने लिहिले की, ‘मला तुझी स्माईल खूप आवडते’. दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘अरे बबिता जी, जेठालालशी बोला नाहीतर तो मरेल’. एकाने ‘तू आळशी आहेस, म्हणूनच आम्ही तुझ्यासाठी वेडे आहोत’. तर एकाने ‘वॉव व्हिडिओ’ असे लिहिले आहे. याआधी बबिताने रॅपर बादशाहच्या जुगनू या प्रसिद्ध गाण्यावर डान्स व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये मुनमुन उघडपणे शॉर्ट्स घालून नाचताना दिसत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओला लाईक्सचा वर्षाव केला होता.

loading image
go to top