WPL MIW vs DCW : हरमनच्या मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्ट्रिक; रोहितच्या संघापुढे ठेवला आदर्श

WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women
WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Womenesakal

WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने आपली जुनी परंपरा तोडली. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्लीचे 106 धावांचे आव्हान मुंबईने 15 षटकात पार करत आपला सलग तिसरा विजय साजरा केला. मुंबईकडून यस्तिका भाटियाने सर्वाधिक 41 धावा केल्या.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स महिला संघाने लीग स्टेजमधील आपले पहिले तीनही सामने जिंकून गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक बळकट केले.

मुंबई इंडियन्सचा पुरूषांचा संघ हा कायम सुरूवातीला हरतो आणि शेवटी सलग विजय मिळवत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवतो. मात्र महिला संघाने याच्या बरोबर उलटे केले.

WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women
WPL DCW vs MIW : मुंबईने 15 व्या षटकातच पार केले दिल्लीचे आव्हान, जिंकला सलग तिसरा सामना

दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे सलामीवीर यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी मुंबईला पॉवर प्लेमध्ये 47 धावांपर्यंत पोहचवले. सेट झालेल्या यस्तिका भाटियाने आक्रमक फटकेबाजी करत 32 चेंडूत 41 धावा केल्या. मुंबई देखील 9 व्य षटकात 65 धावांवर पोहचली होती.

मात्र यस्तिका भाटिया बाद झाली अन् मुंबईची धावगती मंदावली. त्यातच हेली मॅथ्यू 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाली. यानंतर नॅट सिवर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. दिल्ली कॅपिटल्सने टिच्चून मारा आणि उत्कृष्टी फिल्डिंग करत मुंबईचा विजय अवघड करण्याचा प्रयत्न केला.

मात्र हरमन आणि ब्रंटने 15 व्या षटकात मुंबईला विजय मिळवून देत WPL 2023 मधील विजयाची आपली हॅट्ट्रिक पूर्ण केले.

WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women
NZ vs SL 1st Test : तिकडं श्रीलंकेनं पहिल्याच दिवशी 305 धावा केल्या अन् इकडं भारताचं टेन्शन वाढलं

तत्पूर्वी, अव्वल स्थानासाठी होत असलेल्या मुंबई - दिल्ली सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने 105 धावात गुंडाळत सामन्यावर पकड निर्माण केली. मुंबईने पॉवप्लेमध्येच टिच्चून मारा करत दिल्लीला थोपवले. मुंबईकडून सैका इशाकने 13 धावात 3, इसी वँगने 10 धावात 3 आणि हेली मॅथ्यूजने 19 धावात 3 विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक 43 तर जेमिमाह रॉड्रिग्ज तर 25 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com