आडवी-तिडवी फटकेबाजी करणाऱ्या बर्थडे बॉय AB संदर्भातील 10 रंजक गोष्टी

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 17 February 2021

37 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या  एबीसंदर्भातील काही खास आणि रंजक गोष्टी...

क्रिकेटच्या मैदानातील कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या एबी डिव्हिलियर्सचा आज वाढदिवस. आपल्या धमाकेदार खेळीनं त्याने मिस्टर 360 अशी ओळख क्रिकेट जगतात निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये खेळताना दिसते. बंगळुरुची मदार विराट-एबी डिव्हिलियर्स यांच्यावर असल्याचे अनेकदा दिसूनही आले आहे. 37 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या  एबीसंदर्भातील काही खास आणि रंजक गोष्टी...

1. एबीने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र त्याने सर्वाधिक सामन्यात फलंदाज म्हणून संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.  
2. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरकडून तो यंदाच्या हंगामातही खेळताना दिसणार आहे. (Royal Challengers Bangalore)  इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) च्या 14 व्या हंगामात बंगळुरुनं त्याला रिटेन करताच त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. तो आयपीएलमध्ये 100 कोटींची कमाई करणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे.  

फाफ डुप्लेसीची कसोटीमधून निवृत्ती; कारणही केलं स्पष्ट

3. आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी बंगळुरुच्या संघाने त्याला 11 कोटींमध्ये रिटेन केले. 

4. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्समध्ये मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच त्याला मिस्टर 360 डिग्री या नावाने ओळखले जाते.

5. आयपीएलमध्ये त्याने 169 सामने खेळले असून 40.40 च्या सरासरीने त्याने 4, 849 धावा केल्या आहेत. 

6. 2008 च्या पहिल्या हंगामात एबी डिव्हिलियर्स दिल्लीच्या संघाकडून खेळला होता.  2011 पासून म्हणजे यंदाच्या वर्षी तो याच संघाकडून दशकपूर्ती करणार आहे.  

7. क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूला आतापर्यंत राष्ट्रीय संघाकडून प्रतिनिधीत्व करताना एखादा मोठा  पुरस्कार मिळालेला नाही. 

8. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर एबी मैदानात रडताना दिसले होते.

9. एबी डिव्हिलियर्स असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावे वनडेतील सर्वात जलद अर्धशतक, शतक आणि दिडशतक करण्याचा विक्रम आहे. त्याने 16 चेंडूत फिफ्टी, 31 चेंडूत सेंच्युरी तर  64 चेंडूत 150 धावा करण्याचा पराक्रम केला होता. 

10. त्याला तीनवेळा ICC ODI प्लेयर ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  2010, 2014 आणि 2015 मध्ये त्याचा या पुरस्काराने सन्मान झाला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday ab de villiers 2021 You Know ab de villiers joins 100 crore salary club rcb 14th ipl season