Hardik Pandya : पाकविरूद्ध एक 'कडक' कामगिरी अन् पांड्याची ब्रँड व्हॅल्यू सातवें आसमान पर!

Hardik Pandya Brand Value
Hardik Pandya Brand Valueesakal

Hardik Pandya Brand Value : आशिया कपमधील (Asia Cup 2022) आपल्या पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (India Vs Pakistan) 5 विकेट्स राखून पराभव केला. पाकिस्तानने ठेवलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची टॉप ऑर्डर ढेपाळली होती. मात्र हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरत भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही दमदार कामगिरी करत 17 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. त्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला. यानंतर सगळीकडे हार्दिक पांड्याचीच चर्चा सुरू झाली. याचबरोबर अनेक मोठे ब्रँड देखील हार्दिकला साईन करण्यासाठी त्याच्या मागे मागे धावत आहेत. आता हार्दिक पांड्याच्या सोशल मीडिया फीमध्ये देखील वाढ झाली आहे.

Hardik Pandya Brand Value
Hardik Pandya : अक्रम म्हणतो, माझ्या दृष्टीने 'हा' आहे जगातील सर्वात उत्कृष्ट अष्टपैलू

एका रिपोर्ट नुसार पांड्याची ब्रँड मॅनेजर RISE स्पोर्ट्सने सांगितले की, 'गेल्या काही दिवसांमध्ये 6 ते 7 पेक्षा जास्त ब्रँड भारताच्या या ऑलराऊंडरला साईन करण्यासाठी लाईन लावून बसले आहेत. पांड्याची उत्पादनची जाहीरात करण्याची फी देखील 'सातवे आसमान पर' आहे. आता पांड्या एका दिवसाचे जवळपास 2 कोटी रूपये चार्ज करत आहे.

ब्रँड व्हॅल्यूमध्ये 30 ते 40 टक्क्यांची वाढ

एका रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याची ब्रँड व्हॅल्यू आता जवळापस 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. पांड्याचा स्टारडम इतका वाढला आहे की तो आता प्रत्येक ब्रँडसाठी दिवसाला 2 कोटी रूपये चार्ज करतोय. त्यामुळे त्याला प्रत्येक ब्रँड पाठिमागे 4 कोटी रूपये मिळत आहेत. हार्दिक सध्या 8 ते 10 ब्रँडसाठी जाहीरात करतोय. येणाऱ्या काही दिवसात अजून 5 ते 6 ब्रँडची घोषणा होईल.

Hardik Pandya Brand Value
Asia Cup 2022 : झादरान जोडीने बांगलादेशला चोपले; अफगाणिस्तान सुपर 4 मध्ये पोहचणारा पहिला संघ

सोशल मीडिया पोस्टचा देखील भाव वधारला

हार्दिक पांड्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणाचाही प्रचार करण्यासाठी जवळपास 40 लाख रूपये प्रति पोस्ट घेतो. हार्दिक पांड्या आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणारा भारतीय क्रिकेटपटू झाला आहे. सध्या हार्दिक पांड्या बोट (BoAT), मॉन्टर एनर्जी, गल्फ ऑईल, ड्रीम 11 याचबरोबर अनेक कंपन्यांची जाहीरात करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com