IPL 2022: हार्दिकच्या हातून बॅट निसटली अन् थेट...VIDEO

आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्यासोबत अजब घटना घडली.
hardik pandya
hardik pandya esakal

आयपीएल 15 सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेला गुजरात टायटन्स संघ फॉर्मात आहे. मात्र, काल झालेल्या आरसीबीसंघाकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला. विराटच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे 169 धावांचे आव्हान 8 गडी राखून पार केले. मात्र, झालेल्या या सामन्यात गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्यासोबत अजब घटना घडली ज्यामुळे त्याची पत्नी नताशादेखील घाबरली.

hardik pandya
भारतासाठी आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकून देण्याची इच्छा : विराट

झालेल्या या सामन्यात हार्दिकने 47 चेंडूत 62 धावा केल्या. आपल्या पतीला म्हणजेच पांड्याला चिअर अप करण्यासाटी नताशानेदेखील हजेरी लावली होती. गुजरातच्या फलंदाजीदरम्यान असे काही घडले, ज्यामुळे नताशा चांगलीच घाबरली असल्याचे पाहायला मिळालं.

डावाच्या १० व्या षटकादरम्यान, आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटचा चेंडू हार्दिकने लांब मारण्याचा प्रयत्न केला. हार्दिकने एवढ्या जोरात बॅट घुमावली, ती हातातून सटकली स्क्वेअर लेगच्या पंचांसमोर जाऊन पडली.

या घटनेनंतर मैदानात सर्वजण घाबरले. स्टॅन्डसमधून सामन्याचा आनंद घेणारी हार्दिकची पत्नी नताशा देखील बॅट हवेत उडल्याचे पाहून आश्चर्यचकीत झाला होती. तिच्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नताशाच्या या रिएक्शनवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स देत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत हार्दिकसोबत घडलेला प्रकार पाहून शेजारच्या व्यक्तीला हे काय झालं.? असा सवाल इशारा करत असल्याचे पाहायला मिळालं.

hardik pandya
VIDEO : निराश मॅथ्यू वेडची पॅव्हेलिनमध्येच आदळ आपट

गुजरातकडून राशिदने दोन विकेट घेतल्या. तर फाफ ड्युप्लेसिसने 44 धावांचे योगदान दिले. तर ग्लेन मॅक्सवेलने 18 चेंडूत नाबाद 40 धावा चोपल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार 62 धावा केल्या. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत 16 गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com