VIDEO | GT vs RCB : निराश मॅथ्यू वेडची पॅव्हेलिनमध्येच आदळ आपट | Ultra Edge misbehave Matthew Wade Angry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ultra Edge misbehave Angry Matthew Wade Thrown Bat

VIDEO : निराश मॅथ्यू वेडची पॅव्हेलिनमध्येच आदळ आपट

मुंबई : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात आज महत्वाचा सामना होत आहे. आरसीबीसाठी आज करो या मरो अशी स्थिती आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांना गुजरातला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. जॉस हेजवलूडने फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला अवघ्या 1 धावेवर बाद केले. तर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) ऑस्ट्रेलियाच्याच सेट होऊ पाहणऱ्या मॅथ्यू वेडला (Matthew Wade) बाद केले.

हेही वाचा: मुंबई जोफ्राला घेऊन फसली? इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वक्तव्यामुळे अनिश्चितता

ज्यावेळी ग्लेन मॅक्सवेलने 13 चेंडूत 16 धावा करून सेट होत असलेल्या मॅथ्यू वेडला पायचीत (LBW) पकडले. मैदानावरील पंचांनी देखील आपले बोट वर केले. मात्र वेडने डीआरएस (DRS) घेत या निर्णयाविरूद्ध अपील केली. रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागून बाजूला गेल्याचे दिसत होते. मात्र अल्ट्रा एजने (Ultra Edge) कोणताही स्पाईक दाखवला नाही. तिसऱ्या पंचांनी देखील मैदानावरच्या पंचांचा निर्णय योग्य ठरवत वेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हेही वाचा: LIVE मॅच सुरु असतानाच स्टार बॉक्सरला आला हार्ट अटॅक; मुसाचं रिंगमध्येच निधन

दरम्यन, या निर्णयावर चिडलेला मॅथ्यू वेड पॅव्हेलियनमध्ये पोहचला. त्याने पहिल्यांदा आपले हेलमेट फेकले. त्यानंतर निराशेत बॅट जोरात फिरवली. मग तीच बॅट त्याने पॅव्हेलियनच्या एका वस्तूवर आपटली. संशयास्पदरित्या बाद झालेल्या मॅथ्यू वेडने पॅव्हेलियनमध्ये चांगलीच आदळ आपट केली. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात अल्ट्रा एजने अनेक वादग्रस्त निर्णय दिले आहेत. रोहित शर्माच्या बॅटला बॉल लागण्यापूर्वीच अल्ट्रा एजने एक मोठा स्पाईक दाखवला होता. या घटनेची देखील जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात झाली होती. आता फॉर्मसाठी चाचपडत असलेल्या मॅथ्यू वेडसाठी देखील असेच घडले.

Web Title: Ultra Edge Misbehave Angry Matthew Wade Thrown Bat In Dressing Room

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top