भारतासाठी आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकून देण्याची इच्छा : विराट

गुजरात विरूद्धच्या लढतीत काल त्याने ७३ धावा बनवत संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला होता.
Virat Kohli
Virat KohliSakal

IPL 2022 : यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ६७ वा सामना काल बंगळूर आणि गुजरात यांच्यादरम्यान खेळला गेला. या सामन्यात गुणतालिकेत सर्वांत वर असलेल्या गुजरातचा बंगळूर संघाने पराभव केला. दरम्यान या सामन्यात खराब फॉर्म मध्ये असलेल्या विराट कोहलीने ७३ धावांची खेळी केली. त्यामुळे आरसीबीला ८ चेंडू राखून विजय मिळवता आला.

Virat Kohli
RCB vs GT : टीम इंडियाची चिंता मिटली! 'विराट' खेळीने कोहली आला फार्मात

दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने ५ गड्याच्या बदल्यात १६८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीने ८ चेंडू राखून लक्ष्य गाठलं आणि दणदणीत विजय मिळवला. दरम्यान खूप सामन्यांत अपयशी ठरल्यावर विराच कोहलीचं अर्धशतक पाहायला मिळालं. त्याच्या खराब फॉर्ममुळे काही दिवस तो ट्रोल होत होता पण त्याने या सामन्यात ७३ धावा केल्या आहेत. तो बोलताना म्हणाला की, "मी धावा बनवायला सुरूवात केली की मला कसं प्रेरित करायचं हे मला माहिती आहे." त्याने बोलताना भारतासाठी दोन मोठे चषक जिंकण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे.

Virat Kohli
GT vs RCB : कोहलीची विराट खेळी; आरसीबी पोहचली चौथ्या स्थानावर

"मला माहितीये, मी धावा काढायला सुरू केली की कसं प्रेरित व्हायचं ते मला माहिती आहे. भारताने आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकावं अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्यासाठी हेच प्रेरणादायी आहे." असं तो स्टार स्पोर्ट्स ला बोलताना म्हणाला.

तसेच तो पुढे म्हणाला "मला माझ्या फिटनेससाठी समतोल राखावा लागेल, विश्रांती घ्यावी लागेल, एकदा मी त्या मानसिकतेत आलो की परत मागे वळून पाहायचे नाही. भारताला आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे." असं विराटने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com