IPL 2024 : मोहम्मद शमीपासून ते हार्दिक पांड्यापर्यंत...! हे 4 मोठे खेळाडू IPL मधून जाणार बाहेर?

IPL 2024
IPL 2024

IPL 2024 : आयपीएल 2024 आधी अनेक खेळाडूंच्या दुखापतीमुळे फ्रँचाइजीचे टेन्शन वाढले आहे. खरंतर, आयपीएल 2024 सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. पण त्याआधी अनेक मोठे खेळाडू आहेत जे दुखापतींमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहेत.

काही खेळाडूंच्या दुखापती अधिक गंभीर आहेत तर काही कमी आहेत, परंतु अद्याप या खेळाडूंच्या संघात पुनरागमन करण्याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. त्यानंतर अनेक मोठे खेळाडू आयपीएल 2024 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

IPL 2024
Riyan Parag : 6,6,6,6,6,6,6.... 12 षटकार अन् 56 चेंडूत धुंवाधार शतक! परागने ठोठावला थेट टीम इंडियाचा दरवाजा
Mohammed Shami
Mohammed Shami esakal

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये आपल्या गोलंदाजीने खळबळ माजवणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या दुखापतीबाबत ताजी माहिती अशी होती की, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत शमीचे पुनरागमन होऊ शकते, परंतु अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

मोहम्मद शमी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो आणि शमी हा संघातील एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. शमी आयपीएल 2024 मधून बाहेर पडला तर गुजरात संघासाठी हा मोठा धक्का असेल.

Hardik Pandya Injury
Hardik Pandya Injuryesakal

2023 च्या वनडे वर्ल्ड कप दरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. तेव्हापासून पांड्या टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या संघात पुनरागमन करण्याबाबत अद्याप कोणतीही मोठी माहिती समोर आलेली नाही. IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले होते. अशा परिस्थितीत हार्दिक आयपीएल 2024 मधून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

ruturaj gaikwad
ruturaj gaikwadEsakal

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जखमी झाला होता. त्यानंतर गायकवाड टीम इंडियातून बाहेर आहेत. आत्तापर्यंत त्याच्या परत येण्याबाबत कोणतेही नवीनतम अपडेट आलेले नाही.

अफगाणिस्तानसोबतच्या टी-20 मालिकेसाठीही गायकवाडला संघात स्थान मिळालेले नाही. अशा परिस्थितीत गायकवाड जर आयपीएल 2024 ला मुकले तर तो चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठा धक्का ठरू शकतो.

suryakumar yadav
suryakumar yadavesakal

यावेळी आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण संघाचे दोन मोठे खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. हार्दिकनंतर सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. आता सूर्यकुमार यादव यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

आता सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर सूर्यकुमार यादवही आयपीएलमधून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सच्या अडचणी खूप वाढतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com