Hardik Pandya : पांड्याने इंग्रजांच्या बलस्थानावरच चढवला हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya

Hardik Pandya : पांड्याने इंग्रजांच्या बलस्थानावरच चढवला हल्ला

Hardik Pandya Virat Kohli : भारताची धावसंख्या मंदावली असताना भारताचा कुंफू पांड्या हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी करत भारताला 20 षटकात 6 बाद 168 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 33 चेंडूत 63 धावांची खेळी केली. याचबरोबर विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी करत हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. विशेष म्हणजे या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने स्लॉग ओव्हरमध्ये म्हणजे 16 ते 20 षटकात प्रभावी मारा केला होता. पांड्याने याच बलस्थानावर हल्ला चढवला. भारताने शेवटच्या 5 षटकात 2 विकट्स गमावून 68 धावा वसूल केल्या.

हेही वाचा: Virat Kohli : बादशाहत कायम! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मात्र दुसऱ्याच षटकात वोक्सने केएल राहुलला 5 धावांवर बाद केले. त्यानंतर रोहित आणि विराट कोहलीने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला मात्र रोहित 28 चेंडूत 27 धावा करून माघारी परतला.

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारकडून भारताच्या अपेक्षा होत्या. मात्र तो देखील 10 चेंडूत 14 धावा करून आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी 61 धावांची भागीदारी रचली विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले चौथे अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर तो लगेचच बाद झाला.

हेही वाचा: Rohit Sharma : सेमीफायनलपूर्वी रोहित जाम घाबरला होता, टॉसनंतर सगळं सांगितलं

विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने आपला गिअर बदलत भारताला 19 व्या षटकात अर्शतक पार करून दिले. पांड्याने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पांड्याने तुफान फटकेबाजी करत भारताला 20 षटकात 168 धावांपर्यंत पोहचवले. पांड्याने 33 चेंडूत 63 धावांची खेळी केली.