
हरियाणाच्या क्रिकेटपटूने ऋषभ पंतला दीड कोटींना घातला गंडा?
नवी दिल्ली : हरियाणाचा क्रिकेटपटू म्रिनांक सिंह (Haryana cricketer Mrinank Singh) हा एका व्यावसायिकाला गंडा घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. म्रिनांक सिंहने त्याला महागडी घडाळ्या आणि मोबाईल फोन अत्यंत कमी दरात देण्याचे अमिष दाखवले होते. आता म्रिनांक विरूद्ध भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि त्याचा व्यवस्थापक पुनित सोळंकी (Puneet Solanki) यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी म्रिनांकने पंतला बाऊन्स झालेल्या चेकद्वारे 1 कोटी 63 लाख रूपयांना गंडा घातल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा: Women T20 Challenge : 'ही तर महिला आयपीएलची पायाभरणी'
साकेत कोर्टाने गेल्या आठवड्यात अर्थर रोड मुंबईतील जेलमध्ये असलेल्या म्रिनांक सिंहला नोटिस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला स्थानिक व्यावसायिकाला 6 लाखाला गंडा घातल्याप्रकरणी अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत हा फ्रँक मुलर व्हॅनगार्ड याचिंग सिरीज घड्याळ खरेदी करण्याचा विचार करत होता. त्याने यासाठी 36 लाख 25 हजार 120 रुपये क्रेझी कलर वॉच आणि 62 लाख 60 हजार रिचर्ड मिले वॉचसाठी दिले होते.
मिड - डेने दिलेल्या वृत्तानुसार पंतने केलेल्या तक्रारीत सिंगने पंतचा चुकीची माहिती देत विश्वास संपादन केला. तक्रारीत म्हटले आहे की, 'जानेवारी 2021 मध्ये म्रिनांकने पंत आणि सोळंकी यांना त्याने नवा व्यवसाय सुरू केला आहे. यात महागडी घड्याळे, बॅग्ज, दागिने यांची खरेदी विक्री करण्यात येणार आहे. त्याने काही क्रिकेटपटूंना देखील या वस्तू विकल्याचे खोटे सांगितले. त्याने पंत आणि त्याच्या व्यवस्थापकाला तो त्यांच्यासाठी महागडी घड्याळे आणि इतर वस्तू कमी किमतीत देऊ शकतो असे सांगितले.'
हेही वाचा: IND vs PAK: हाय व्होल्टेज पाकिस्तानने अखेरच्या क्षणी साधली बरोबरी
म्रिनांकला ऋषभ पंतने फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडील महागडी घड्याळे आणि काही दागिने पुन्हा विक्री करण्यासाठी दिली होती. या वस्तू त्याने 65 लाख 70 हजार 731 रुपायांना खरेदी केल्याचा म्रिनांकचा दावा आहे.
Web Title: Haryana Cricketer Mrinank Singh Conned Rishabh Pant
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..