
शिवम पठारे एक २२ वर्षीय उदयोन्मुख कबड्डीपटू, वडिलच त्याचे पहिले गुरू, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून आज तो भारतासाठी खेळण्याचं स्वप्नही पाहातोय. अहमदनगरमधून आलेल्या शिवमला घरातूनच कबड्डीचं बाळकडू मिळालंय. आज तो प्रो कबड्डीमध्ये हरियाना स्टीलर्सचे प्रतिनिधित्व करतोय.
त्याचं हे प्रो कबड्डीतील तिसरं वर्ष असून त्याला हरियाना स्टीलर्सने २० लाखांमध्ये रिटेन केलं होतं. त्याच्याशी आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल ई-सकाळने साधलेला हा संवाद...