
पुण्यातील एका गावातला साधा मुलगा, ज्याच्या आईचं स्वप्न होतं की आपला लेक कबड्डी खेळताना टीव्हीवर दिसावा. आईच्या या स्वप्नासाठी त्यानेही कसून मेहनत घेतली. जिद्दीच्या जोरावर कबड्डी जगतात त्याची ओळख निर्माण करण्यासाठी तो आता झटतोय. तो खेळाडू आहे विकास जाधव.
२० वर्षांच्या विकासने विविध स्पर्धा खेळून त्याने प्रो - कबड्डीच्या मैदानातही पाऊल टाकले आहे. सध्या तो हरियाना स्टिलर्सकडून खेळताना दिसतोय. त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा राहिलाय याबद्दल त्याच्याशी ई-सकाळने साधलेला हा संवाद...