Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Lovepreet Singh inspiring success story: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या लव्हप्रीत सिंगने पुरुषांच्या ११०+ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. पंजाबच्या या बलाढ्य वेटलिफ्टरने स्पर्धेदरम्यान गेम्स रेकॉर्ड नोंदवत अखेरच्या प्रयत्नापर्यंत सुवर्णपदकावर मजबूत दावा केला होता. मात्र शेवटच्या क्षणी न्यूझीलंडच्या डेव्हिड लिटीने अविश्वसनीय पुनरागमन करत बाजी पलटवली.
Lovepreet Singh inspiring success story

Lovepreet Singh inspiring success story

Updated on

Lovepreet Singh wins Commonwealth Games 2026 gold medal : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात गुरुवारी आणखी एक पदक जमा झाले... मध्यरात्रीच्या सत्रात नाशिकच्या दिलीप गावितने पॅरा धावपटूंमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर, रात्री वेटलिफ्टर लव्हप्रीत सिंगने ऐतिहासिक कामगिरी केली. पंजाबच्या लव्हप्रीतने पुरुषांच्या ११०+ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याने गेम्स रेकॉर्ड नोंदवला. शेवटच्या क्षणापर्यंत तो सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होता, परंतु न्यूझीलंडच्या डेव्हिड लिटीने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात २२३ किलोचा भार यशस्वीपणे उचलला आणि एका किलोच्या फरकाने त्याने भारतीय वेटलिफ्टरवर मात केली. लव्हप्रीतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com