अजून तीन भोपळे मग 'भोपळ्यांची' गादी सचिनकडून विराटकडे येणार Virat Kohli Out On Duck | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Out On Duck
अजून तीन भोपळे मग 'भोपळ्यांची' गादी सचिनकडून विराटकडे येणार

अजून तीन भोपळे मग 'भोपळ्यांची' गादी सचिनकडून विराटकडे येणार

पार्ल : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) बॅड पॅचमध्ये आहे की नाही हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. तो कधी सेट होऊन बाद होतो तर कधी भोपळाही न फोडता माघारी जातो. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी मालिका वाचवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मात्र याच सामन्यात भारताचा महत्वाचा फलंदाज विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी गेला. (Virat Kohli Out On Duck)

हेही वाचा: #RSAvsIND: 'समालोचकांना विनंती डेथ ओव्हर म्हणू नका'

विशेष म्हणजे या भोपळ्याबरोबरच विराट कोहली एका विक्रमाच्या दिशेने आगेकूच करत आहे. तीनही क्रिकेट प्रकारात सर्वाधिकवेळा भोपळाही न फोडता बाद होण्याचा हा विक्रम आहे. भारताकडून सर्वाधिकवेळा भोपळाही न फोडता माघारी जाण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. तो ३४ वेळा शून्यावर बाद झाला होता. यानंतर विरेंद्र सेहवाग आणि आता विराट कोहली हे दोघे संयुक्तरित्या या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. हे दोघेही ३१ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

हेही वाचा: U19 WC: भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; BCCI ने घेतला मोठा निर्णय

२९ वेळा बदक मिळालेला सौरभ गांगुली (Sourav Ganguly) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर युवराज सिंग २६ भोपळे घेऊन चौथ्या स्थानावर आहे. जर विराट कोहलीचा भोपळे न फोडण्याचा पराक्रम असाच सुरू राहिला तर तो लवकरच सचिन तेंडुलकरची जागा घेईल हे नक्की. कारण सचिनच्या शतकांच्या शतकाचा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून ३० शतके करायची आहेत. तर शून्यावर बाद होण्यात सचिनला मागे टाकण्यासाठी विराटला फक्त तीन भोपळ्यांची गरज आहे. (Virat Kohli will Break Sachin Tendulkar Record)

Web Title: India Vs South Africa 2nd Odi Virat Kohli Goes On Duck 31st Time In Career May Broke Sachin Tendulkar Record

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top