#RSAvsIND: 'समालोचकांना विनंती डेथ ओव्हर म्हणू नका' |Laxman Sivaramakrishnan Requested Not Use Death Overs) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laxman Sivaramakrishnan Requested All Commentators

#RSAvsIND: 'समालोचकांना विनंती डेथ ओव्हर म्हणू नका'

भारत आणि दक्षिण आफ्रिका (RSA vs IND) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने ३१ धावांनी जिंकत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या एकदिवसीय (ODI) सामन्यादरम्यान, भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी समालोचन करत असताना आपल्या सह समालोचकांना (Commentator) एक विनंती केली. (Laxman Sivaramakrishnan Requested All Commentators Not Use Death Overs)

हेही वाचा: RSA vs IND Live: शिखर-राहुलची अर्धशतकी सलामी

एकदिवसीय किंवा टी २० क्रिकेटमध्ये एका डावाची शेवटची काही षटके फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फार महत्वाची असतात. फलंदाज या षटकात जास्तीजास्त धावा कुटण्याच्या प्रयत्नात असतात. तर गोलंदाज फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यासाठी आपल्या जीवाचा बाजी लावतात. या शेवटच्या रोमांच षटकांना काही समालोचक डेथ ओव्हर (Death Overs) म्हणून संबोधतात.

हेही वाचा: हरभजन सिंग, गीता बसराला कोरोनाची लागण

शिवरामकृष्णन सध्या आयसीसी क्रिकेट समितीमध्ये (International Cricket Council Cricket Committee) खेळाडूंचे एक प्रतिनिधी म्हणून काम करतात. लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी भारत - दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यावेळी एक ट्विट (Tweet) केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणातात 'सर्व समालोचकांना विनंती कृपा करुन डेथ ओव्हर हा शब्दप्रयोग करु नका. त्याला स्लॉग ओव्हर किंवा एन्ड ओव्हर्स असे म्हणा. आपण अत्यंत कठीण काळातून जात आहोत. डेथ हा शब्द चांगला नाही. शेवटची १० षटके महत्वाची आहेत. पण, जर ती एखाद्या संघाविरुद्ध गेली तर कोण मरत नाही.' #SAvIND

हेही वाचा: LCL : मिसबाहच्या एशियन लायन्सला 'पठाणी' दणका

शिवरामकृष्णन यांनी या ट्विटद्वारे एक वेगळाच मुद्दा चर्चेला दिला आहे. आपण, बोलण्याच्या ओघात किंवा भावनेच्या भरात अनेक जहाल शब्द वापरून जातो. मात्र खरंच ते संयुक्तिक असतात का याचा विचार करण्याची गरज शिवरामकृष्णन यांच्या ट्विटवरुन भासते.

Web Title: Laxman Sivaramakrishnan Requested All Commentators Not Use Death Overs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..