ICC Media Rights : वर्ल्ड कप पाहण्याचा अंदाज बदला; ZEE अन् Disney Star मध्ये करार

ZEE एंटरटेनमेंट आणि डिस्ने स्टार यांनी मंगळवारी ICC पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या टीव्ही हक्कांसाठी करार केला.
Disney Star licenses part of its ICC rights to Zee in landmark agreement
Disney Star licenses part of its ICC rights to Zee in landmark agreementsakal

ICC Media Rights : ZEE एंटरटेनमेंट आणि डिस्ने स्टार यांनी मंगळवारी ICC पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या टीव्ही हक्कांसाठी करार केला. करारानुसार झी तिच्या टेलिव्हिजन चॅनेलवर सर्व पुरुष आणि अंडर-19 जागतिक क्रिकेट सामने प्रसारित करेल, तर स्टारकडे फक्त डिजिटल अधिकार असेल. मंगळवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात डिस्ने स्टार आणि झी एंटरटेनमेंटने सांगितले की, आयसीसीने या कराराला सहमती दर्शवली आहे. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी डिस्नेने 2024 ते 2027 या चार वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क विकत घेतले होते. यासाठी डिस्ने स्टारने तीन अब्ज डॉलर्सची रक्कम भरली होती.

Disney Star licenses part of its ICC rights to Zee in landmark agreement
IND vs HK : नवख्या हाँगकाँग संघाविरुद्ध चुका सुधारण्याची रोहितला संधी

Disney ने 2027 च्या अखेरीस पुरुष आणि महिला क्रिकेटच्या जागतिक स्पर्धांचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार मिळवले होते. मात्र, आता पुरुषांचे टीव्ही प्रसारण झी एंटरटेनमेंटद्वारे केले जाणार आहे. 2024 ते 2027 या कालावधीत आयसीसीच्या पुरुषांच्या चार स्पर्धा आहेत. यामध्ये दोन T20 विश्वचषक, 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2027 मधील एकदिवसीय विश्वचषक यांचा समावेश आहे.

Zee चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक पुनीत गोयनका म्हणाले की, २०२७ पर्यंत ICC पुरुष क्रिकेट स्पर्धांसाठी वन-स्टॉप टेलिव्हिजन डेस्टिनेशन म्हणून ZEE आपल्या दर्शकांना एक तल्लीन करणारा अनुभव देईल. यासाठी झी जाहिरातदारांना मदत करेल आणि त्याच्या नेटवर्कच्या ताकदीचा फायदा घेईल. आम्ही आयसीसी आणि डिस्ने स्टारसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

Disney Star licenses part of its ICC rights to Zee in landmark agreement
FIFA U-17 WWC : भारतातील वर्ल्डकपमध्ये ‘वार’ तंत्रज्ञानाचा वापर

डिस्ने स्टारकडे IPL टीव्हीचे हक्क -

डिस्ने स्टारने या वर्षी जूनमध्ये आयपीएल टीव्हीचे हक्क परत मिळवले आहे. डिस्ने स्टारने यासाठी एकूण 23575 कोटी रुपयांची डील केली होती. डिस्नेने 2023-27 हंगामासाठी हे आयपीएल हक्क विकत घेतले. तथापि डिस्ने स्टार डिजिटल अधिकार खरेदी करण्यात अयशस्वी ठरले. Viacom18 ने IPL चे डिजिटल अधिकार 20500 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com