esakal | 'विराटचं ओझं रोहितच्या खांद्यावर' TRP साठी स्टंट बाजी?
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli And Rohit Sharma

'विराटचं ओझं रोहितच्या खांद्यावर' TRP साठी स्टंट बाजी?

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरीनंतर भारतीय संघातील सर्वच खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रंगीत तालीम रंगण्यास सुरुवात होण्यापूर्वी क्रिकेट वर्तुळात विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावे पुन्हा एकदा ट्रेंडिगमध्ये आली आहेत. युएई आणि ओमानच्या मैदानात रंगणाऱ्या वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीचे कर्णधारपद रोहित शर्माच्या खांद्यावर जाणार अशी चर्चा रंगताना दिसते.

क्रिकेट हा जसा अनिश्चिततेचा खेळ आहे अगदी बीसीसीआयचे निर्णयही असेच असतात. त्यामुळे पुढे काय होईल त्याचा काही नेम नाही. एका बाजूला या सर्व चर्चा रंगत असताना तुम्हाला मागील आयपीएल स्पर्धेतील काही घटना आठवल्या तर नवल वाटणार नाही. आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सर्व सामने युएईच्या मैदानात रंगले होते. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. दोघांच्यातील मतभेद टोकाला गेल्याची चर्चा रंगली होती.

हेही वाचा: US Open Final: मेदवेदेवनं नंबर वन जोकोविचला रडवलं!

रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सला विक्रमी पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिल्यानंतर विराट कोहली ऐवजी रोहित शर्माकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धूरा देण्याच्या चर्चेला उत आला. याच वेळी रोहित शर्माच्या दुखापतीची कोहलीला खबर नसल्याची गोष्टीही पुढे आली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितच्या नावाचा समावेश का नाही? असा प्रश्न जेव्हा विराटला विचारला होता त्यावेळी कोहलीने त्याच्यासंदर्भातील अपडेट नाही असे उत्तर दिले होते. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर दोघांच्यामध्ये टोकाचे मतभेद असल्याचे बोलले गेले.

हेही वाचा: मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत

इंग्लंड दौऱ्यावर रोहित विराटचं मनोमिलन

भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोघांच्यामध्ये मनोमिलन घडून आल्याचे सांगण्यात आले. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या मर्यादित षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने पराभूत केले. तेव्हापासून विराट-रोहित यांच्यातील दरी आणखी वाढल्याचे बोलले गेले. एका बाजूला या चर्चा रंगत असताना विराट कोहलीने दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे म्हटले होते. त्यामुळेच या सर्व चर्चा लोकांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असून PR स्टंटबाजी आहे का? असा प्रश्न एखाद्याला पडला तर नवल वाटू नये.

loading image
go to top