ICC Mens T20I Player Rankings : बाबर टॉपर; कोहली टॉप 10 मधून आउट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat And Babar
T20I Rankings : बाबर टॉपर; कोहली टॉप 10 मधून आउट

T20I Rankings : बाबर टॉपर; कोहली टॉप 10 मधून आउट

ICC Mens T20I Player Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि लोकेश राहुल (KL Rahul) यांनी आपल्या स्थानात सुधारणा केलीये. दुसरीकडे विश्रांतीवर असलेल्या विराट कोहलीच्या स्थानात घसरण झालीये. तो टॉप टेनमधून बाहेर गेलाय. रोहित शर्माने 15 व्या स्थानावर 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. फलंदाजांच्या टॉप टेनच्या यादीत लोकेश राहुल हा एकमेव भारतीय आहे. तो 729 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहचला आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत कॅप्नसीची नवीन इंनिंग सुरु करणाऱ्या रोहीत शर्माने दोन अर्धशतके झळकावली होती. 56, 55 आणि 48 धावांची खेळी करत रोहित शर्माने मॅन ऑफ द सीरिज पटकावली होती. या खेळीचा त्याला फायदा झाला असून त्याचे रँकिंगमध्ये दोन स्थानाने सुधारणा झालीये.

हेही वाचा: रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नेहमीच 'अजिंक्य'

फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वलस्थानी आहे. त्याच्या खात्यात 809 अंक आहेत. इंग्लंडचा डेविड मलान 805 अंकासह दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा एडम मार्करम 796 रेटिंगसह तिसऱ्या तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 735 अंकासह चौथ्या स्थानावर आहे. लोकेश राहुलच्या खात्यात 729 गुण जमा आहेत.

हेही वाचा: WBBL हरमनप्रीतने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय

ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंच याच्या क्रमवारीत एका स्थानांनी सुधारणा झाली असून 709 अंकासह तो सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा ड्वेन कॉन्वे तीन स्थानांच्या घसरणीसह सातव्या स्थानावर पोहचलाय. त्याच्या पाठापाठ जोस बटल (674) आठव्या, रस्सी व्हॅन डर डुसेन (669) नवव्या आणि मार्टिन गप्टिल (658) गुणांसह टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे.

loading image
go to top