esakal | ICC ODI Rankings: मिताली राजची कमाल; वनडेत नवव्यांदा टॉपर
sakal

बोलून बातमी शोधा

Mithali Raj

ICC ODI Rankings: मिताली राजची कमाल; वनडेत नवव्यांदा टॉपर

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC वनडे रँकिंग (ICC Rankings) मध्ये मिताली राज (Mithali Raj) ने पुन्हा एकदा कमाल केलीये. ती पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाली आहे. कारकिर्दीत नवव्यांदा मिताली राज टॉपर बनली आहे. पहिल्या दहा महिला फलंदाजांमध्ये स्मृती मानधनाच्या नावाचाही समावेश आहे. ती आयसीसीच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. (ICC ODI Rankings Mithali Raj Becomes Number One Batsman For The Record 9th Time In ODI Rankings)

दुसरीकडे आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये शफाली वर्माने अव्वलस्थान पटकावले आहे. या यादीत स्मृती मानधना तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी 20 रँकिंगमध्ये वेस्ट इंडिजची कर्णधार स्टेफनी टेलर अव्वल होती. या स्थानावरुन घसरण झाल्यानंतर ती आता पाचव्या स्थानावर पोहचली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यानंत तिला 30 गुणांचा चांगलाच फटका बसलाय.

हेही वाचा: 'हे' आहेत Tokyo Olympics मध्ये खेळणारे सर्वाधिक लहान आणि वयस्कर खेळाडू

गोलंदाजी रँकिंगमध्ये झूलन गोस्वामी ही एकमेव भारतीय गोलंदाज टॉप टेनमध्ये आहे. ती क्रमवारीत 5 व्या स्थानावर आहे. वनडे आणि टी-20 मध्ये भारतीय महिलांचा दबदबा पाहायला मिळतो. ऑराउंडर रँकिंगमध्ये दीप्ति शर्मा 10 व्या स्थानावर आहे. टी-20 रँकिंगमध्ये स्मृतीने कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंगवर पोहचली आहे.

हेही वाचा: गरीबीतून थेट आंतराष्ट्रीय स्तरावर झेप, संस्कृतीने जिंकली अनेक पदके

काही दिवसांपूर्वीच मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राजच्या खात्यात 10,337 धावा आहेत.

loading image