Wanindu Hasaranga
Wanindu Hasaranga esakal

Wanindu Hasaranga : श्रीलंकेच्या हसरंगाची पहिल्या स्थानी झेप

आयसीसी टी-२० गोलंदाजी क्रमवारी

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत श्रीलंकेचा वनिंदु हसरंगा पहिल्या स्थानावर पोहचला आहे. हसरंगाने अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानची जागा घेतली आहे.

हसरंगाने सध्या चालू असलेल्या विश्वकरंडकामध्ये १५ गडी बाद केले. यात त्याने तीन वेळा एका सामन्यात तीन फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे. त्याने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध ८ धावा देत ३ गडी बाद केले होते; तर नेदरलँडविरुद्ध २८ धावा देत ३ आणि अफगाणिस्तानविरुद्ध १३ धावा देत ३ गडी बाद केले होते.

अष्टपैलू ट्वेंटी-२० क्रमवारीत झिम्बाब्वेचे सीन विलियम्स आणि सिकंदर रझा हे अव्वल १० खेळाडूंमध्ये आहेत. रझा १८४ गुणांसह चौथ्या स्थानावर; तर विलियम्स गुणांसह नवव्या स्थानावर आहे. विलियम्सने २०२२ मध्ये ट्वेंटी-२० सामन्यात ३९५ धावा काढल्या आहेत.

सूर्या पहिल्या; तर पंड्या तिसऱ्या स्थानावर

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे, पण या यादीत सूर्याखेरीज भारताच्या एकाही फलंदाजाला अव्वल दहामध्ये स्थान मिळालेले नाही. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानावर असून या यादीतही पंड्याशिवाय भारताचा एकही खेळाडू नाहीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com