पाकिस्तानचे गद्दाफी स्टेडियम खेळण्यास अयोग्य, ICC ने लॉर्ड्स खेळपट्टीवरही ओढले ताशेरे

ICC Pitch Rating आयसीसीने 'असमाधानकारक' असा शेरा मारत लॉर्ड्ससह लाहोर येथील गदाफी स्टेडियमच्या खेळपट्टीवरही कारवाई केली आहे. या दोन्ही मैदानांना एक दोषांक गुण देण्यात आला.
ICC Finds Gaddafi Stadium Pitch Unsatisfactory

ICC Finds Gaddafi Stadium Pitch Unsatisfactory

Esakal

Updated on

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी सुमार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'असमाधानकारक' असा शेरा मारत आयसीसीने लॉर्ड्ससह लाहोर येथील गदाफी स्टेडियमच्या खेळपट्टीवरही कारवाई केली आहे. आयसीसीच्या खेळपट्टी आणि मैदान समितीने या दोन खेळपट्टया असमाधानकारक असल्याचे म्हटले आहे. लॉर्ड्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नुकताच पहिला कसोटी सामना झाला तर गदाफी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय लढत झाली. Lord's and Lahore Pitches Receive ICC Demerit Point

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com