esakal | ICC T20 World Cup 2021 : SRH च्या 'चीअर बॉय'ला ऑस्ट्रेलिया तरी प्लेइंग 11 मध्ये घेणार? फिंचनं दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

SRH च्या 'चीअर बॉय'ला ऑस्ट्रेलिया तरी प्लेइंग 11 मध्ये घेणार?

SRH च्या 'चीअर बॉय'ला ऑस्ट्रेलिया तरी प्लेइंग 11 मध्ये घेणार?

sakal_logo
By
सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेविड वॉर्नर सध्या संघर्ष करताना दिसतोय. आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिल्याच टप्प्यात त्याच्या खांद्यावरील नेतृत्वाचे ओझे विल्यमसनच्या खांद्यावर देण्यात आले. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर बसवण्यात आले. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून सनरायझर्स हैदराबाद बाद ठरल्यानंतर वॉर्नर ऑरेंज आर्मीचा झेंडा फडकवत संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाले. पुन्हा तो या संघातून खेळेल की नाही याबाबत शंका उपस्थितीत होत असताना ऑस्ट्रेलियन संघ आगामी वर्ल्ड कपमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देईल का? असा प्रश्नही निर्माण झालाय.

सनरायझर्स हैदराबादकडून सातत्याने अपयशी ठरलेल्या वॉर्नरसंदर्भात ऑस्ट्रेलियन टी-20 संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने मोठे वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियन संघात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान असेल. एवढेच नाही तर तोच डावाची सुरुवात करेल, असे फिंचने म्हटले आहे.

हेही वाचा: इशानचं धडाकेबाज अर्धशतक! 'अशी' कामगिरी करणारा १०वा फलंदाज

भारतामध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत कॅप्टन्सी गमावल्यानंतर युएईमध्ये सुरु झालेल्या स्पर्धेसाठी वॉर्नर पुन्हा एकदा संघात सामील झाला. ज्या दोन सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली त्यात तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. एका सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही तर दुसऱ्या सामन्यात तो केवळ 2 धावा करुन तंबूत परतला होता. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा बाकावर बसण्याची वेळ आली.

हेही वाचा: मुंबईचा हिटमॅन 400 Not Out! 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय

आयपीएलमधील त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? असा प्रश्न फिंचला विचारण्यात आला होता. यावर फिंचने हो नक्की स्थान मिळेल, असे उत्तर दिले. तो ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाच्या डावाला सुरुवातही करेल, असे फिंचने स्पष्ट केले. 23 आक्टोबरला ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्द भिडणार आहे. ऑस्ट्रेलियन संघातील ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेजलवूड यांनी आयपीएलमध्ये विशेष छाप सोडली असून ते राष्ट्रीय संघाकडून अशीच धमाकेदार कामगिरी करण्यास उत्सुक असतील. दुसरीकडे वॉर्नर बॅडपॅच म्हणून सावरत ऑस्ट्रेलियन संघासाठी मोलाची कामगिरी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top