esakal | IPL 2021: मुंबईचा हिटमॅन... 400 Not Out! 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-400

रोहितने मुंबईच्या संघाला दिली धडाकेबाज सलामी

मुंबईचा हिटमॅन 400 Not Out! 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs RR: राजस्थान विरूद्ध झालेल्या 'करो या मरो'च्या सामन्यात मुंबईच्या संघाने एकतर्फी खेळ करत सामना जिंकला. राजस्थान संघाकडून सलामीवीर एव्हिन लुईसने झटपट २४ धावांची खेळी केली होती. पण त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांना केवळ ९० धावांपर्यंतच मजल मारता आली. हे सोपे आव्हान मुंबईच्या संघाने २ गड्यांच्या बदल्यात सहज पार केले. सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक दमदार कामगिरी केली.

हेही वाचा: इशानला फॉर्ममध्ये परतण्यासाठी 'या' तीन क्रिकेटपटूंनी केली मदत

हेही वाचा: मुंबईकडून झाला लाजिरवाणा पराभव; RR च्या नावे नकोसा विक्रम

९१ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले. इशान किशन पिचवर सेट होण्यास वेळ घेत असताना रोहितने आपली दमदार बॅटिंग सुरू केली. रोहितने पहिल्याच षटकात चेतन साकरियाला उत्तुंग असा षटकार लगावला. त्या षटकारासह रोहितचे टी२० क्रिकेटमध्ये एकूण ४०० षटकार पूर्ण झाले. टी२० क्रिकेटच्या इतिहासात ४०० षटकारांचा टप्पा गाठणारा रोहित हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत रोहित सातवा आहे. या यादीत ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्र रसल, ब्रेंडन मॅक्कलम, शेन वॉटसन आणि एबी डिव्हिलियर्स हे फलंदाज रोहितच्या पुढे आहेत.

loading image
go to top