esakal | IPL 2021: इशानचं धडाकेबाज अर्धशतक! 'अशी' कामगिरी करणारा १०वा फलंदाज | Ishan Kishan
sakal

बोलून बातमी शोधा

Ishan-Kishan-Six

MI vs RR: इशान किशनने लगावले नाबाद अर्धशतक

इशानचं धडाकेबाज अर्धशतक! 'अशी' कामगिरी करणारा १०वा फलंदाज

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs RR: मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थानचा दारूण पराभव केला. अतिशय अटीतटीचा सामना होणार अशी चाहत्यांना अपेक्षा होत. पण मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना चारीमुंड्या चीत केले आणि एकतर्फी सामना जिंकला. राजस्थानकडून सलामीवीर एव्हिन लुईसने सर्वाधिक २४ धावा केल्या. तर मुंबईकडून धडाकेबाज डावखुरा फलंदाज इशान किशनने नाबाद अर्धशतक ठोकले. किशनचं अर्धशतक खास ठरलंच. पण त्यासोबतच त्याने IPLमधील एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला.

हेही वाचा: IPL 2021: राजस्थानच्या फलंदाजांनी केलं निराश; ओढवली नामुष्की

मुंबईच्या संघाला राजस्थानने अवघ्या ९१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने नवव्या षटकातच लक्ष्य गाठले आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. इशान किशनने २५ चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. इशान किशन ४४ धावांवर असताना विजयासाठी २ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी इशान किशनने उत्तुंग षटकार लगावत सामना तर जिंकलाच पण आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्यासोबतच, इशानने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना आपल्या १,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. याआधी नवी खेळाडूंनी मुंबईकडून वैयक्तिक १,००० धावा पूर्ण केल्या होत्या. इशान किशन मुंबईकडून एक हजार धावांचा टप्पा गाठणारा दहावा खेळाडू ठरला.

हेही वाचा: IPL Against RR ट्रेंडिगमागची गंमत; फ्रेंचायझीनही दिलं उत्तर

loading image
go to top