India vs Pakistan T20 World Cup 2026 Match Cancelled
esakal
India vs Pakistan T20 World Cup clash cancelled, raising concerns over ICC revenue and PCB penalties : टी-२० विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना ( ind pak match news ) खेळण्यास नकार दिला आहे. या स्पर्धेला अवघे सहा दिवस बाकी असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या या निर्णयानंतर आयसीसीनेही ( icc on pak issue in marathi ) परिपत्रक जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आयसीसीकडून देण्यात आला आहे.