esakal | T20I Rankings : शफाली पहिली तर अदांनी घायाळ करणारी स्मृतीही भारीच!
sakal

बोलून बातमी शोधा

shafali verma  and smriti Mandhana

T20I Rankings : शफाली पहिली तर अदांनी घायाळ करणारी स्मृतीही भारीच!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Women ICC T20I Rankings: भारतीय महिला संघाची स्टार युवा फलंदाज शफाली वर्मा (Shafali Verma) हिने आयसीसी टी20 रँकिंगमध्ये अव्वलस्थान कायम राखले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मंगळवारी जाहीर केलेल्या नव्या टी-20 क्रमवारीत ती 759 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन आणि इंग्लंडची नॅटली सिवर 377 गुणांसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.

फलंदाजीमध्ये आस्ट्रेलियाची बेथ मूनी (744) गुणांसह दुसऱ्या तर भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना (716) गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तिच्यापाठोपाठ मेग लेनिंग (709) आणि सोफी (689) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: 'कॅलेंडर ग्रँडस्लॅम' पासून जोकोविच काही अंतरावर

सोफीने होवच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात 50 धावांची खेळी केली होती. याशिवाय तिने 26 धावा खर्च करुन 2 विकेट घेतल्या होत्या. याचा तिला अष्टपैलू रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.

हेही वाचा: IND vs ENG : शास्त्री-कोहली यांच्यासाठी कोरोनाची वेगळी नियमावली?

भारतीय महिला संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ब्रिस्बेनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईनच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय महिला संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसह एक कसोटी सामनाही खेळणार आहे. या मालिकेत शफालीच्या कामगिरी आणखी सुधारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय महिला संघाचे सर्व सामने हे क्वींसलंडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. 21 सप्टेंबरपासून भारतीय महिला संघाच्या सामन्याला सुरुवात होणार आहे.

loading image
go to top