ICC T20 Ranking : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला फायदा; टी-20 क्रमवारीत वर्चस्व कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC T20 Ranking

ICC T20 Ranking : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला फायदा; टी-20 क्रमवारीत वर्चस्व कायम

ICC T20 Ranking : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियावर ६ विकेटने विजय साकारला आणि टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली. या मालिका विजयामुळे भारतीय संघाने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील पहिले स्थान आणखी बळकट केले आहे. भारत २६८ रेटिंगसह पहिल्या स्थानावर असून इंग्लंडचा संघ २६१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये आता सात रेटिंगचा फरक झाला आहे.

हेही वाचा: Ind Vs Sa : ऑस्ट्रेलियानंतर आता टीम इंडिया अफ्रिकेची नांगी ठेचण्यासाठी सज्ज; जाणून घ्या शेड्यूल

भारतीय संघासमोर आता दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. या मालिकेत विजय साकारल्यास टीम इंडियाला पहिले स्थान आणखीन बळकट करता येणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. आगामी मालिकेत भारतीय संघावर विजय मिळवल्यास त्यांना टी-२० क्रमवारीत आगेकूच करता येणार आहे.

पाकिस्तानला संधी

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत सातपैकी चार टी-२० लढती झालेल्या आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ लढती जिंकल्या आहेत. पाकिस्तानने चौथी लढत जिंकल्यामुळे भारतीय संघाला पहिल्या स्थानासाठी आणखी बळकटी मिळाली आहे.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वीच टीम इंडियातून 3 खेळाडू बाहेर

उर्वरित लढतींमध्ये विजय मिळवल्यास पाकिस्तानला क्रमवारीत पुढे वाटचाल करता येईल. एका लढतीत विजय साकारल्यास इंग्लंडला दुसऱ्या स्थानावर कायम राहता येईल. दरम्यान, भारतीय संघाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. विश्‍वकरंडकाआधी त्यांना सहा लढती खेळावयाच्या आहेत.

  • भारत - २६८

  • इंग्लंड - २६१

  • दक्षिण आफ्रिका - २५८

  • पाकिस्तान - २५८

  • न्यूझीलंड - २५२

  • ऑस्ट्रेलिया - २५०