Ind Vs Sa : ऑस्ट्रेलियानंतर आता टीम इंडिया अफ्रिकेची नांगी ठेचण्यासाठी सज्ज; जाणून घ्या शेड्यूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs South Africa

Ind Vs Sa : ऑस्ट्रेलियानंतर आता टीम इंडिया अफ्रिकेची नांगी ठेचण्यासाठी सज्ज; जाणून घ्या शेड्यूल

India vs South Africa : भारतीय संघाला टी-20 विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर दोन T20 मालिका खेळायच्या आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता टीम इंडिया अफ्रिकेची नांगी ठेचण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेची पाळी आहे. 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरू होत आहे. ज्यामध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

हेही वाचा: T20 World Cup : रोहितला टी-20 वर्ल्डकप मध्ये अंतिम षटकांतील गोलंदाजीची चिंता

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका कधी सुरू होणार?

दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. टीम इंडियाला 28 सप्टेंबरपासून टी-20 मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची द्विपक्षीय मालिका असणार आहे.

  • पहिला टी-20 : 28 सप्टेंबर, तिरुवनंतपुरम, संध्याकाळी 7.30 वाजता

  • दुसरा T20: 2 ऑक्टोबर, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30

  • तिसरा T20: 4 ऑक्टोबर, इंदूर, संध्याकाळी 7.30

एकदिवसीय मालिका

  • पहिली वनडे : 6 ऑक्टोबर, लखनौ, दुपारी 1.30

  • दुसरी वनडे: 9 ऑक्टोबर, रांची, दुपारी 1.30 वाजता

  • तिसरी वनडे : 11 ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी 1.30 वाजता

हेही वाचा: IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का, हा अष्टपैलू खेळाडू दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघ :

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण टी-20 संघ :

टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसेन, तबरेज शम्सी.