IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वीच टीम इंडियातून 3 खेळाडू बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs South Africa T20 Series

IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वीच टीम इंडियातून 3 खेळाडू बाहेर

India vs South Africa T20 Series : भारतीय संघाला टी-20 विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका खेळायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेची पाळी आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचे 3 स्टार खेळाडू संघाबाहेर गेले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

हेही वाचा: IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का, हा अष्टपैलू खेळाडू दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर

mohammed shami

mohammed shami

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता. आजून ही तो कोरोनातून बरा झाला नाही. निवडकर्त्यांनी उमरान मलिकला त्याच्या जागी स्टँडबायवर ठेवले आहे. मोहम्मद शमी त्याच्या किलर बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे.

हेही वाचा: T20 World Cup : रोहितला टी-20 वर्ल्डकप मध्ये अंतिम षटकांतील गोलंदाजीची चिंता

Deepak Hooda

Deepak Hooda

भारताचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डाला ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान पाठीला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडावे लागले. दीपकच्या जागी निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरचा संघात समावेश केला आहे. भारताच्या टी-20 विश्वचषकासाठी दीपक हुड्डा यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत जर त्याची दुखापत बरी झाली नाही तर तो भारतीय कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढवू शकतो.

हेही वाचा: Ind Vs Sa : ऑस्ट्रेलियानंतर आता टीम इंडिया अफ्रिकेची नांगी ठेचण्यासाठी सज्ज; जाणून घ्या शेड्यूल

Hardik Pandya

Hardik Pandya

टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. आयपीएल 2022 पासून तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पंड्याच्या जागी शाहबाज अहमदचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.