esakal | ICC चा मोठा निर्णय; T20 WC मध्ये पहिल्यांदाच दिसणार 'ही' गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-ICC-DRS

T20 World Cup च्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार

ICC चा मोठा निर्णय; T20 WC मध्ये पहिल्यांदाच दिसणार 'ही' गोष्ट

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup 2021: सध्या युएईमध्ये IPL 2021चा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यानंतर युएई आणि ओमानमध्ये T20 World Cup चा थरार रंगणार आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान टी२० विश्वचषक स्पर्धा युएई आणि ओमान या दोन देशांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेला अवघे सात दिवस शिल्लक असताना ICCने एक मोठा निर्णय घेतला आहे. ICCने यंदाच्या T20 वर्ल्ड कपपासून DRS प्रणालीच्या वापराला परवानगी दिली आहे.

हेही वाचा: T20 WC: हार्दिकचा पत्ता कट? रोहितच्या विधानाने चर्चांना उधाण

१७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीला पात्रता फेरीचे सामने रंगतील आणि त्यानंतर मूळ स्पर्धा सुरू होईल. यंदाच्या स्पर्धेपासून टी२० विश्वचषक स्पर्धेत DRS प्रणालीचा वापर केला जाणार असल्याचे ICCने सांगितले. इएसपीएनक्रिकइन्फोच्या माहितीनुसार, प्रत्येक संघाला एका डावात जास्तीत जास्त दोन DRS च्या संधी मिळतील. "कोरोनाचा काळ असल्याने टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी कदाचित अंपायरिंगचा अनुभव कमी असलेले काही पंच कार्यरत असू शकतात. त्यांच्याकडून अनावधानाने काही चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत संघांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी टी२० सामन्यांमधील प्रत्येक डावातील DRS ची संख्या २ इतकी तर कसोटी सामन्यांसाठी ३ इतकी करण्यात आली आहे.

हेही वाचा: T20 World Cup पाक विरुद्ध नव्या लूकमध्ये दिसणार टीम इंडिया

हेही वाचा: "तर श्रेयस अय्यरला मिळणार T20 World Cupचं तिकीट"

आतापर्यंत झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धांमध्ये DRS चा वापर करण्यास ICC ने परवानगी नाकारली होती. त्यानंतर २०१८मध्ये झालेल्या महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत DRS चा वापर करण्यात आला होता. त्या स्पर्धा विंडीजमध्ये झाल्या होत्या. त्यापाठोपाठ २०२० मध्ये झालेल्या महिला टी२० विश्वचषक स्पर्धेतही DRS चा वापर करण्यात आला होता. त्या सामन्यात भारतीय महिला संघाला फायनलमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती.

loading image
go to top