esakal | T20 World Cup: हार्दिकचा पत्ता कट? रोहितच्या विधानाने चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-Hardik-Pandya

IPL मधून मुंबईचा संघ बाहेर जाताच रोहितचं वक्तव्य

T20 WC: हार्दिकचा पत्ता कट? रोहितच्या विधानाने चर्चांना उधाण

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup: IPL 2021मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास साखळी फेरीत संपला. काही खेळाडूंच्या सातत्याने अपयशी ठरण्यामुळे संघाला त्याचा फटका बसला. त्यातील एक खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. त्याला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून घेतला होता, पण त्याने एकदाही गोलंदाजी केली नाही. कर्णधार रोहित शर्माने शेवटच्या सामन्यातनंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीबाबत एक असं वक्तव्य केलं की ज्यामुळे त्याचा संघातून पत्ता कट केला जातो की काय अशी एक वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे.

हेही वाचा: अशा खेळाडूला संघात घेतलंच कसं? गंभीरचा थेट निवड समितीला सवाल

रोहित म्हणाला की हार्दिक पांड्याने IPL मध्ये एकही चेंडू टाकलेला नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे आगामी T20 World Cup साठी तो भारतीय संघात आपले स्थान कायम राखेल की नाही? याबद्दल रोहितने शंका उपस्थित केल्याचे दिसून आले अशी चर्चा आहे. हार्दिक पांड्याने शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना आठ चेंडूत १० धावा केल्या. २८ सप्टेंबरला पंजाब किंग्जवर मुंबई इंडियन्सने सहा विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पांड्याने ३० चेंडूत ४० धावांची नाबाद खेळी केली होती; परंतु त्याची गोलंदाजीची तंदुरुस्ती हा विश्वकरंडकाआधी चिंतेचा विषय आहे.

हेही वाचा: KKRच्या विजयानंतर 'मुंबई इंडियन्स' ट्रोल; भन्नाट मीम्स व्हायरल

Hardik-Pandya-MI

Hardik-Pandya-MI

हेही वाचा: हार्दिक पांड्यासंदर्भात रोहित शर्मानं केलं मोठ वक्तव्य

IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांना मुकल्यानंतर पांड्याने मुंबईसाठी केवळ फलंदाज म्हणून कामगिरी केली. "भारतात झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही पांड्याने गोलंदाजी केली नव्हती. दुखापतीतून सावरल्यापासून पांड्याने अजून एकदाही गोलंदाजी केलेली नाही. वैद्यकीय पथक त्याच्या गोलंदाजीच्या तंदुरुस्तीवर काम आहे. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये सुधारणाही होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कदाचित तो गोलंदाजी करण्यास सक्षम होऊ शकतो. फलंदाजीत पांड्याने आत्तापर्यंत निराशा केली असली तरी, आम्हाला त्याच्या गुणवत्तेवर विश्वास आहे", असेही रोहितने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटले. मात्र, हार्दिकने गोलंदाजी केली नाही या वक्तव्यावरून चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

loading image
go to top