ICC Test Rankings : ऑस्ट्रेलिया WTC चॅम्पियन... दोन कसोटीही जिंकल्या तरी भारतच बाप

ICC Test Rankings
ICC Test Rankingssakal

ICC Test Rankings : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने आधी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव केला, त्यानंतर अॅशेस मालिकेत सलग दोन सामन्यांत इंग्लंडचा पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलिया आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा संघ बनेल, अशी अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही.

दरम्यान, कांगारू संघ अॅशेस मालिकेवर कब्जा करण्याआधी तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने त्यांचा पराभूत करून मालिका जिंकण्याचे मनसुबे सध्या धुळीस मिळाले आहेत. मात्र, अद्याप दोन कसोटी बाकी असून दोन्ही संघांना मालिका आपल्या नावावर करण्याची संधी असेल.

ICC Test Rankings
David Warner Retirement : खूप सारं प्रेम डेव्हिड... पत्नीची इन्स्टाग्राम गूढ पोस्ट, वॉर्नर झाला निवृत्त?

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर

आयसीसी टेस्ट रँकिंगबद्दल बोलायचे झाले तर सध्या टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसीच्या वेबसाइटनुसार, पहिल्या क्रमांकावर टीम इंडिया आहे आणि त्याचे 121 गुण आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू संघाचे 116 गुण आहे. पण मनोरंजक गोष्ट म्हणजे हे रँकिंग WTC फायनलपूर्वीचे आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला गेला, जो 11 तारखेपर्यंत चालला, परंतु 2 मे पासून आयसीसीची वेबसाइट अपडेट केलेली नाही. म्हणजेच या तारखेनंतर जे काही विजय-पराजय झाले, त्याचा परिणाम गुण, मानांकन आणि क्रमवारीवर दिसत नाही. या क्रमवारीनंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना झाला, त्यानंतर अॅशेस मालिकेचे तीन सामने झाले, पण आयसीसीची वेबसाइट तशीच आहे.

ICC Test Rankings
IND vs WI: 'कधीही वाटलं नव्हतं...', कोहलीने कोच द्रविडसाठी लिहिली भावनिक पोस्ट

आयसीसीकडून खेळाडूंची क्रमवारी दर आठवड्याला अपडेट

दरम्यान, विशेष बाब म्हणजे आयसीसीकडून प्रत्येक बुधवारी खेळाडूंची क्रमवारी बदलली जाते. विशेषत: कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत सातत्याने बदल होत आहेत. कारण सध्या हे दोन फॉरमॅट खेळले जात आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामने कमी झाले आहेत.

मात्र दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी संघांच्या क्रमवारीत का बदल केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रमवारी अपडेट झाल्यास ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल आणि टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर घसरण्याची दाट शक्यता आहे.

ICC Test Rankings
World Cup India Vs Pakistan : काय खरं नाही! ते पत्र पाठवून पीसीबीनं माती खाल्ली; पाक सरकार जाम भडकलं

आयसीसी कसोटी क्रमवारीतील उर्वरित संघ

पहिल्या दोन संघांची क्रमवारी सांगितली आहे, पण बाकीच्या संघांची काय अवस्था आहे, हेही जाणून घ्या. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचे 114 रेटिंग आहे आणि चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे, ज्यांचे रेटिंग सध्या 104 आहे. 2021 WTC फायनल आणि विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झालेला न्यूझीलंड संघ पाचव्या क्रमांकावर आहे आणि त्याचे रेटिंग 100 आहे. पाकिस्तानी संघ 86 च्या रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. जरी हे योग्य रँकिंग नाही, कारण ते सामन्यांनंतर अपडेट केले जात नाही. येत्या काळात रँकिंग अपडेट होईल, तेव्हाच खरी गोष्ट काय आहे, हेही कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com