ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही क्रिकेट? ICCने सुरू केली मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket-Olympics

ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही क्रिकेट? ICCने सुरू केली मोर्चेबांधणी

ICCने अधिकृत ट्वीट करून दिली महत्त्वाची माहिती

भारतीय संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उत्तम प्रकारे यश मिळवलं. ऑलिम्पिक स्पर्धेवरून परतणाऱ्या खेळाडूंनी सांगितलं की आता विश्रांतीला वेळ नसून पुढच्या ऑलिम्पिकची तयारी केली पाहिजे. त्यामुळे आता सर्व चाहत्यांच्या नजरा पुढील ऑलिम्पिककडे आहेत. अशातच क्रिकेट चाहत्यांसाठी एक सुखद धक्का देणारी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ICCने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा: Video: विराटचं तगडं 'वर्कआऊट'; राशिद खानच्या कमेंटची चर्चा

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीतील सदस्य ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रक्रियेबाबत पाठपुरावा करत आहेत. ऑलिम्पिक २०२८, २०३२ आणि त्यापुढील सर्व ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी ही समिती प्रयत्न करत आहे. लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते आहेत जे अमेरिकेत राहतात. त्यांनाही ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो आहे. त्यामुळे जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर ते क्रिकेट आणि ऑलिम्पिक या दोन्हीसाठी फायद्याचे ठरेल. क्रिकेटची लोकप्रियता आणि ऑलिम्पिकची व्यापकता या दोन्ही गोष्टींचा फायदा एकमेकांना होईल.

हेही वाचा: 'टीम इंडिया'ला नडलेला न्यूझीलंडचा क्रिकेटर 'लाईफ सपोर्ट'वर

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा आधी केला होता समावेश

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करा ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. भारताच्या वतीने BCCIने सांगितले होते की ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर भारत त्यात नक्कीच सहभागी होईल. आता टोक्यो ऑलिम्पिक २०२० संपल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकची तयारी सुरू करण्यात आली आहे. १२८ वर्षांपुर्वी पॅरिसमध्येच १९०० सालचे ऑलिम्पिक खेळवले गेले होते. त्या स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होता. पण त्यावेळी क्रिकेटला म्हणावी तशी लोकप्रियता नसल्याने हा खेळ पुढील ऑलिम्पिकपासून वगळण्यात आला.