India vs Australia Semifinal Confirmed
esakal
महिला क्रिकेट विश्वकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केलं आहे. ऑस्ट्रेलियाने आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या या विजयासह सेमिफायनलच्या लढतीही निश्चित झाल्या आहेत. त्यानुसार पहिल्या सेमिफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या सेमिफायनल मध्ये इंग्लड-दक्षिण आफ्रिका एकमेकांना भिडणार आहेत.