South Africa crush Sri Lanka
esakal
महिला विश्वकप स्पर्धेतील १८व्या लीग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सलग चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत दुसरे स्थानही पटकावलं आहे. पावसामुळे हा सामना २० षटकांचा खेळवण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे आफ्रिकेच्या या विजयाने भारताची धाकधूक वाढली असून भारताचं टॉप ४ मधील स्थान धोक्यात आलं आहे.