esakal | ICC WTC Point Table : विराट सेनेची 'टश्शन'; साहेबांच्या ताफ्यात 'टेन्शन'!
sakal

बोलून बातमी शोधा

  ICC WTC Point Table, Team India on 2nd Position,ICC World Test Championship

एका स्थानासाठी तीन संघ सध्या स्पर्धेत आहेत. यात भारतीय संघाची दावेदारी अधिक भक्कम मानली जात आहे.

ICC WTC Point Table : विराट सेनेची 'टश्शन'; साहेबांच्या ताफ्यात 'टेन्शन'!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

ICC WTC Point Table Team India on 2nd Position : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅपियनिशप क्रमवारीत भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. चेन्नई कसोटीतील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर पोहचला होता. मालिकेसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवणे गरजेचे होते. 317 धावांनी विजय नोंदवत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधत वर्ल्ड टेस्ट्र चॅम्पियनशिपच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मागे टाकले. 

न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. एका स्थानासाठी तीन संघ सध्या स्पर्धेत आहेत. यात भारतीय संघाची दावेदारी अधिक भक्कम मानली जात आहे. पहिल्या पराभवानंतर भारतीय संघाने दिमाखदार कमबॅक करत क्रिकेटच्या पंढरीत खेळण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

 भारत आणि इंग्लंड यांच्यातील निकालानंतर आयसीसीने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्रमवारीचा तक्ता शेअर केलाय. यात न्यूझीलंडचा संघा 5 मालिकेतील 7 विजयासह पहिल्या स्थानावर आहे. 

INDVvsENG अश्विनच्या मिम्सवर पत्नी झाली फिदा; ट्विट होतंय व्हायरल

न्यूझीलंडच्या खात्यात 420 गुण असले तरी त्यांचे विनिंग पर्सेंटेज टीम इंडियापेक्षा अधिक म्हणजे 70 टक्के आहे. भारतीय संघाच्या खात्यात 460 गुण आहेत मात्र भारतीय संघ सहावी कसोटी मालिका खेळत असून त्यांची विनिंग पर्सेंटेज 69.7 इतके आहे.  या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ 69.2 विनिंग पर्सेंटेजसह तिसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा संघ 67.00 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला अधिक संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे इंग्लंडला पुढील सर्व सामने जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रवेश हा या मालिकेच्या निकालावर अवलंबून आहे.