FIFA World Cup France : फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला तर कोच रचतील इतिहास; एम्बाप्पेलाही आहे मोठी संधी

FIFA World Cup 2022 France Vs Argentina
FIFA World Cup 2022 France Vs Argentinaesakal

FIFA World Cup 2022 France Vs Argentina : कतारमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 ची सांगता आज (दि. 18) रात्री अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील लढीतनंतर होईल. फायनल सामन्यात गतविजेत्या फ्रान्ससमोर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिनाचे मोठे आव्हान असणार आहे. जर फ्रान्सने अर्जेंटिनाचे हे आव्हान परतवून लावले तर ते सलग दोनवेळा वर्ल्डकप जिंकण्याची किमया करतील. याचबरोबर अनेक विक्रमांना देखील गवसणी घालतील. फ्रान्सचे कोच डिडीयेर डुशाम्प यांना देखील मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. ते खेळाडू आणि कोच म्हणून देखील वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य राहिले आहेत. याचबरोबर युवा किलियन एम्बाप्पेला देखील पेलेंचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.

FIFA World Cup 2022 France Vs Argentina
FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला तर काय होईल; मेस्सी किती रेकॉर्ड्स मोडेल?

फ्रान्स वर्ल्डकप जिंकला तर काय होईल?

1 - फ्रान्स जर वर्ल्डकप जिंकली तर 1960 नंतर सलग दोन वर्ल्डकप जिंकणरी पहिली टीम ठरेल. यापूर्वी ब्राझीलने 1958 आणि 1962 असे सलग दोन वर्ल्डकप जिंकले होते.

2 - याचबरोबर फ्रान्स आपले गतविजेतेपद अबाधित राखणारी वर्ल्डकप इतिहासातील तिसरा संघ ठरले. यापूर्वी इटलीने 1934 आणि 1938 ला वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर ब्राझीलने 1958 - 1962 ला वर्ल्डकप जिंकला होता.

3 - याचबरोबर डिडीयेर डुशाम्प हे 1938 नंतर सलग दोन वर्ल्डकप जिंकणारे संघ व्यवस्थापक ठरतील. यापूर्वी इटलीच्या व्हिटोरियो पोझ्झो यांनी ही कामगिरी केली होती.

4 - याचबरोबर डुशाम्प हे खेळाडू म्हणून वर्ल्डकप जिंकणारे आणि मॅनेजर असताना दोनवेळा वर्ल्डकप जिंकणारे पहिले व्यक्ती ठरतील. सध्या त्यांनी ब्राझीलच्या मारियओ झागालो, जर्मनीच्या फ्रांझ बेकेनबावर यांच्याशी बरोबरी केली आहे.

FIFA World Cup 2022 France Vs Argentina
FIFA WC22: 165 कोटींची किंमत; तरी वर्ल्डकप विजेत्याला मिळणार खोटी ट्रॉफी!

5 - फ्रान्स वर्ल्डकप जिंकला तर सलग 5 व्यांदा युरोपियन देश वर्ल्डकपवर कब्जा करेल आणि आपली मक्तेदारी कायम ठेवले.

6 - जर अर्जेंटिनाचे मेस्सी, अल्वारेझ आणि फ्रान्सचा गिरोडने फायनलमध्ये गोल केला नाही आणि एम्बाप्पेने गोल केला तर तो गोल्डन बूटचा मानकरी ठरेल.

7 - एम्बाप्पेने जर फायनलमध्ये एक गोल केला तर तो पेले, अर्जेंटिनाचा मारिओ केम्पेस आणि कोलंबियाच्या जेम्स रॉड्रगिजच्या 24 वर्षाचा होण्यापूर्वीच एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी करले. जर त्याने दोन गोल केले तर तो 24 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com