esakal | एकाच शब्दांत कोच पी. गोपिचंद यांनी केलं सिंधूचं अभिनंदन; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

P. Gopichand_P V Sindhu

एकाच शब्दांत कोच पी. गोपिचंद यांनी केलं सिंधूचं अभिनंदन; म्हणाले...

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या पी. व्ही. सिंधू हीचं राष्ट्रीय कोच पी. गोपिनाथ यांनी अभिनंदन केलं आहे. आपल्या अभिनंदनपर संदेशात त्यांनी केवळ "awesome" अशा एका शब्दांतच सिंधूचं कौतुक केलं आहे. (In just one word coach p Gopichand congratulated Sindhu aau85)

पी. गोपिचंद म्हणाले, ""खूपच छान" सिंधूच्या ऑलिम्पिकमधील दुसऱ्या पदकावर यशस्वीरित्या नाव कोरल्याबद्दल अभिनंदन. सिंधूची स्वतःची मेहनत, संघाचे कोच आणि पाठिंबा देणारा संपूर्ण स्टाफ यांच्या कामगिरीचं तिला फळ मिळालं आहे. त्याचबरोबर मी खेळ मंत्रालय आणि भारतीय खेल प्राधिकरण (SAI) आणि भारतीय बॅडमिंटन प्राधिकरण (BAI) यांचेही आभार मानतो."

हेही वाचा: सिंधूची मेडल जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली...

Tokyo Olympics स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तिने चीनच्या हे बिंगजिओ हिला २१-१३, २१-१५ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. सिंधूच्या या विजयामुळे भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक मिळवलं. याआधी वेटलिफ्टर मिराबाई चानूने रौप्यपदकाची कमाई केली होती.

हेही वाचा: Olympics : त्झू यिंगची 'ताइ'गिरी सिंधूचे गोल्डन स्वप्न भंगले

दरम्यान, काल याच स्पर्धेत सिंधूला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड नंबर वन ताइ त्झू यिंगने 21-18, 21-12 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत फायनल गाठली होती. या पराभवामुळे सिंधूचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. तरीही तिच्याकडून पदकाची आस कायम होती कारण तिची लढत आज चीनच्या हे बिंगजिओ हीच्यासोबत होती. हा सामना जिंकत तिनं आपलं कांस्य पदक निश्चित केलं.

loading image
go to top